पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चला, आता जास्त पगार हातात येणार!; ESIC योगदानात कपात

प्रातिनिधिक छायाचित्र

कर्मचारी विमा योजनेसाठी नोकरदारांच्या वेतनातून प्रतिमहिना कापून घेण्यात येणाऱ्या योगदानाची टक्केवारी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यापूर्वी प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्याच्या वेतनातून कर्मचारी आणि कंपनी या दोघांचे योगदान मिळून ६.५ टक्के इतकी रक्कम कापून घेतली जात होती. ती आता ४ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात वेतनाची जास्त रक्कम येईल. १ जुलैपासूनच नव्या नियमानुसार कपात केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

मराठा आरक्षण : अध्यादेशाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

कर्मचारी विमा योजनेचा लाभ कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना होत असतो. याच योजनेसाठी संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतनातून दर महिन्याला ठराविक रक्कम कापून घेतली जात असते. कंपनीकडूनही प्रत्येक कर्मचाऱ्यामागे ठराविक रक्कम घेतली जाते. कंपनीचे योगदान आधी ४.७५ टक्के होते. ते आता ३.२५ टक्के करण्यात आले आहे. तर कर्मचाऱ्याचे योगदान आधी १.७५ टक्के होते. ते आता ०.७५ टक्के करण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १ टक्के वेतन कमी कापले जाईल आणि ते दर महिन्याला त्याच्या हातात मिळेल.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सुमारे ३.६ कोटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास ज्या कर्मचाऱ्याचे वेतन १० हजार होते. त्याच्या वेतनातून आधी दर महिन्याला १७५ रुपये कापले जायचे. पण आता त्याच्या वेतनातून ७५ रुपयेच कापले जातील. उर्वरित १०० रुपये त्यांच्या निव्वळ वेतनातून त्यांना दिले जातील. कंपनीचा हिस्सा कमी करण्यात आल्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भारही कमी होईल.

भारत स्वतःचं अंतराळ स्थानक उभारणारः इस्रो प्रमुख

१ जानेवारी १९९७ रोजी कर्मचारी विमा योजनेसाठी योगदानाची ६.५ टक्के इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. २०१७ पासून २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी आरोग्य विमा योजनेच्या कक्षेत आणण्यात आले आहे.