पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सिलिकॉन व्हॅलीत कर्मचाऱ्यांसह वेतनातही कपात, नवीन भरती स्थगित'

सिलिकॉन व्हॅली

भारतीय उद्योगपती आणि आयटी व्यावसायिकांचे केंद्र असलेल्या सिलिकॉन व्हॅलीने कोरोना विषाणूच्या फैलावानंतर उद्भवलेल्या स्थितीला सामोरे जाण्याची तयारी सुरु केली आहे. यामध्ये कर्मचारी कपात, वेतनात कपात आणि नव्या कर्मचारी भरतीस स्थगितीचा समावेश आहे. आघाडीचे गुंतवणूकदार रंगास्वामी यांनी 'पीटीआय-भाषा' बोलताना म्हटले की, गुगल आणि फेसबुकसारख्या मोठ्या आयटी कंपन्यांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. परंतु, अनेक स्टार्टअपमध्ये कर्मचाऱ्यांची कपात किंवा त्यांच्या वेतनात कपातीची तयारी सुरु झाली आहे. 

...म्हणून मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलऐवजी ३ मे पर्यंत वाढवला?

रंगास्वामी यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्टार्टअपच्या स्थितीबाबत म्हटले की, या सर्व कंपन्या सध्या त्यांच्याकडे १८ ते २४ महिन्यांसाठी पर्याप्त रोकड आहे की नाही याची चाचपणी करत आहेत. पैसे गोळा करण्यासाठी हा वाईट काळ आहे. कारण आता जर ते पैसे जमवण्याचा प्रयत्न करु लागले तर त्यांना अत्यंत कमी किंमत मिळेल. अशात मला वाटते की, पुढील महिन्यात बे एरियातून तुम्हाला मोठ्या संख्येने बेरोजगारीच्या बातम्या वाचायला मिळतील. २००७, २००८ नंतर कदाचितच असे ऐकायला मिळाले असेल. उलट त्यावेळीही अशी परिस्थिती नव्हती. परंतु, २००० नंतर पहिल्यांदाच दीर्घकाळ अशी परिस्थिती असेल.

चिंता नको, जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध - अमित शहा

पाच टक्के कर्मचारी संख्येवर प्रभाव पडण्याची शक्यता

सिलिकॉन व्हॅली स्वतः स्टार्टअप्सला कपात करण्यासाठी प्रेरित करत आहे, असे रंगास्वामी यांनी म्हटले. ते म्हणाले की, असे नाही की यामुळे अर्धी सिलिकॉन व्हॅली बंद होईल. यामुळे पाच टक्के कर्मचारी संख्या प्रभावित होऊ शकते किंवा १० टक्के काम कमी केले जाऊ शकते. लोकांना वेतनात १० टक्के कपात सहन करावी लागण्याची शक्यता आहे.

देशव्यापी लॉकडाऊसह IPL चा कांउटडाऊनही वाढतोय!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:layoffs in Silicon Valley salary cuts and preparations to ban recruitments Corona hit on IT sector