पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कट, कॉपी, पेस्ट'चे संशोधनकर्ते लॅरी टेस्लर यांचे निधन

लॅरी टेस्लर

सध्याच्या काळात कॉम्प्युटर वापरताना जवळपास प्रत्येकजण कट, कॉपी, पेस्टचा वापर करतोच. पण ही संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात आणली ते कॉम्प्युटर शास्त्रज्ञ लॅरी टेस्लर यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. 

दिल्ली निवडणुकीत भाजपने तयार केले डीपफेक व्हिडिओ, प्रचारात नवे आव्हान

१९४५ मध्ये न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या लॅरी टेस्लर यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केली. १९७३ मध्ये त्यांनी झेरॉक्सच्या पॉलो आल्टो रिसर्च सेंटरमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी कट, कॉपी, पेस्ट ही संकल्पना शोधली. हीच संकल्पना आता सर्वच कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये वापरली जाते.

देवेंद्र फडणवीसांना नागपूर कोर्टाकडून जामीन मंजूर

१९८० मध्ये लॅरी टेस्लर यांच्यासह झेरॉक्स कंपनीतून अनेकांनी ऍपलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. झेरॉक्स कंपनीने आपले लक्ष छायाकिंत प्रत (फोटोकॉपी) तयार करण्यासाठी मशिन निर्माण करण्यावर केंद्रित केल्यामुळेच लॅरी टेस्लर यांनी ती कंपनी सोडून ऍपलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ऍपलने त्यावेळी कॉम्प्युटर निर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित केले होते. स्टिव्ह जॉब्ज हे त्याचे नेतृत्त्व करीत होते. त्यामुळेच लॅरी टेस्लर त्या कंपनीमध्ये गेले. लिसा आणि इतर ऍपल उत्पादनांच्या निर्मितीमध्ये त्यांचे प्रमुख योगदान होते. ऍपलमधून बाहेर पडल्यावर २००१ ते २००५ मध्ये त्यांनी ऍमेझॉनमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी याहूमध्येही काम केले. २००९ पासून ते सल्लागार म्हणून स्वतंत्रपणे काम करीत होते.