पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खूशखबर! ईपीएफओची कर्मचाऱ्यांना भेट, नव्या व्याजदराला मंजुरी

खूशखबर! ईपीएफओची कर्मचाऱ्यांना भेट, नव्या व्याजदराला मंजुरी

सात महिन्यांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर अखेर केंद्र सरकारने मंगळवारी आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ईपीएफवर ८.६५ टक्के व्याजास मंजुरी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर सहा कोटींहून अधिक सक्रिय अंशधारकांना फायदा मिळेल. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) या वर्षी फेब्रुवारीमध्ये आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ईपीएफओवर ८.६५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अर्थ मंत्रालयाने मंजुरी न मिळाल्यामुळे आजपर्यंत ग्राहकांच्या ते खात्यात जमा करता आले नव्हते.

मारुती सुझुकी ३० सप्टेंबरला करणार सर्वांत स्वस्त SUV, जाणून घ्या किंमत

ईपीएफओने अर्थ मंत्रालयाकडून औपचारिक परवानगीची वाट पाहत असल्याचे म्हटले होते. कारण अशा पद्धतीच्या विलंबामुळे डिपॉजिटवर मिळणाऱ्या परताव्यावर प्रतिकूल परिणाम पडतो.

व्याजदरात १० आधार अंकांची (०.१० टक्के) वाढ केली गेली आहे. कारण आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये या व्याजावर ८.५५ टक्के दर होता. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्येही ईपीएफवर ८.५५ टक्के व्याज होते. केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांनी या महिन्याच्या सुरुवातीसच सीबीटीच्या प्रती आश्वस्त केले होते. त्यांच्या मंत्रालयाने आता अधिसूचीत केले आहे. 

पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध: बँकेचे सर्व व्यवहार ठप्प

आर्थिक वर्ष २०१९-१९ मध्ये ईपीएफवर ८.६५ टक्के व्याज दर दिल्यानंतर ईपीएफओकडे केवळ १५१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी राहिला आहे. जो पूर्वीच्या स्तरापेक्षा कमी आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये त्यांच्याकडे ५८६ कोटी रुपये अतिरिक्त होते.

AIRTEL 'या' प्लॅनबरोबर देत आहे २ जीबी डेटा आणि ४ लाखांचा विमा