एकपात्री विनोदी कलाकार (स्टॅंडअप कॉमेडियन) कुणाल कामरावर इंडिगोने आपल्या विमानातून प्रवास करण्यावर घातलेली बंदी ६ महिन्यांवरून ३ महिन्यांपर्यंत कमी केली आहे. जानेवारीमध्ये कुणाल कामरावर बंदी घालण्यात आली होती. पण त्यामध्ये बदल करण्यात आला आहे, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात दिली.
दिल्ली दंगलीची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली, काँग्रेसची टीका
इंडिगोच्या अंतर्गत समितीने कुणाल कामरावर घातलेली प्रवास बंदी तीन महिन्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात दिली. न्या. नवीन चावला यांच्यापुढे ही माहिती देण्यात आली.
नवी मुंबईत दोन वेगवेगळ्या घटनांत तरुणीवर तिघांचा बलात्कार
कुणाल कामरावर देशातील चार खासगी विमान कंपन्यांनी सहा महिन्यांसाठी प्रवास बंदी घातली आहे. मुंबई-लखनऊ विमानामध्ये कुणाल कामरा याने टीव्ही पत्रकार अर्णव गोस्वामींशी अयोग्य वर्तन केल्यामुळे त्याच्यावर इंडिगो विमान कंपनीने सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती. त्यामुळे कुमाल कामराला या काळात इंडिगोच्या विमानातून प्रवास करता येणार नाही. इंडिगोनंतर एअर इंडिया आणि स्पाईसजेट आणि गोएअर या तीन विमान कंपन्यांनी कुणाल कामरावर बंदी घातली होती.