पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोटक महिंद्रा बॅंकेच्या नफ्यात वाढ, चौथ्या तिमाहीचे आकडे आश्वासक

कोटक महिंद्रा बँक

गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या एकत्रित निव्वळ नफ्यामध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेचा नफा २०३८.२७ कोटींवर जाऊन पोहोचला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये बँकेने १७८९.२४ कोटी रुपयांचा नफा कमाविला होता. 

गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये बँकेचे उत्पन्न १३८२३.३३ कोटींवर जाऊन पोहोचले आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये बँकेचे उत्पन्न १०८७४.१२ कोटी इतके होते. गत आर्थिक वर्षामध्ये बॅंकेचा एकूण निव्वळ नफा ७२०४ कोटींवर गेला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षामध्ये बँकेचा नफा ६२०१ कोटी रुपये इतका होता. 

'ग्राहकांना विमा पॉलिसीची सर्व माहिती वेळेत द्या'

३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेची बुडीत कर्जे ही एकूण कर्जाच्या १.९४ टक्के इतकी होती. त्याआधीच्या आर्थिक वर्षामध्ये हीच टक्केवारी १.९५ टक्के इतकी होती. गत आर्थिक वर्षासाठी सर्व समभागधारकांना प्रत्येक समभागासाठी ०.८० पैसे इतक लाभांश देण्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले आहे.