पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आंदोलनाच्या काळात इंटरनेट बंद ठेवल्याने तासाला किती कोटींचे नुकसान होते माहितीये?

आंदोलनाच्या काळात अनेक ठिकाणी इंटरनेट बंद ठेवण्यात येते.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या आणि एनआरसीच्या विरोधात सध्या देशाच्या अनेक भागांत आंदोलन करण्यात येत आहेत. या आंदोलनांना काही ठिकाणी हिंसक वळणही लागले आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर तेथील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पण इंटरनेट सेवा बंद ठेवल्याने मोबाईल आणि टेलिकॉम कंपन्यांना रोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसतो आहे. 

'गूड न्यूज'साठी बॅड न्यूज!, कर्नाटक हायकोर्टात सिनेमा विरोधात याचिका

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सांगण्यानुसार देशाच्या अनेक भागांमध्ये इंटरनेट बंद ठेवण्यात येत असल्यामुळे प्रत्येक तासाला अडीच कोटी रुपयांचे नुकसान होते आहे. आंदोलनाच्या काळात कोणीही अफवा पसरवू नये, चुकीची माहिती देऊन सामान्यांची दिशाभूल केली जाऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही राज्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येत आहे. 

इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येत असल्यामुळे सामान्यांनाही त्याचा फटका बसतो. विशेषतः प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांना त्याचा जास्त त्रास होतो. इंटरनेट बंद असल्यामुळे हवाई, रेल्वे प्रवासाची तिकीटे ऑनलाईन बुक करता येत नाही. ओला-उबर यासारख्या खासगी प्रवासी वाहनांचे बुकिंग करता येत नाही. त्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.

... म्हणून आंदोलकांना आता धडकी भरली, उत्तर प्रदेश CMO चे ट्विट्स

अनेक ठिकाणी लोक ऑनलाईन पद्धतीने पैसे देतात. रुग्णालयांमध्येही याच माध्यमातून पैसे दिले जातात. पण इंटरनेट नसल्यामुळे अशा पद्धतीने पैसे अदा करणे शक्य होत नसल्याचे लोक सांगतात. यामुळे अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसते.