भारतीय बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या विजय माल्याच्या मालकीच्या किंगफिशर हाऊसचा आणखी एकदा लिलाव होणार आहे. मागील तीन वर्षात लिलावाची ही आठवी वेळ आहे. सध्याच्या घडीला याठिकाणी किंगफिशर एअरलाइन्स लिमेटेडचे मुख्यालय आहे.
'शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल'
ऑनलाइनच्या माध्यमातून २७ नोव्हेंबरला लिलाव होणार असल्याची घोषणा बंगळुरु स्थित कर्ज वसुली प्राधिकरणाने (डीआरटी) केली आहे. संबंधित संपत्तीच्या पहिल्या लिलावावेळी १३५ कोटी रुपयांपासून लिलाव सुरु झाला होता. २०१६ या संपत्तीचे मूल्य १५० कोटी इतके होते. त्यानंतर आता आठव्यांदा होणाऱ्या लिलावात ५४ कोटींपेक्षा कमी निर्धारित किंमतीने बोली लावण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
'सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेचा संपर्क फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीशी'
लिलावात काढण्यात आलेल्या इमारतीचे पॅराडिगम हे पूर्वीचे नाव बदलून किंगफिशर हाऊस असे करण्यात आले होते. लिलावतील एकूण जागा ही १ हजार ५८६ स्क्वेअर फूट इतकी आहे. याचवर्षी ५ जानेवारी रोजी विशेष पीएमएलए न्यायालयाने मल्ल्याला फरारी आर्थिक आरोपी घोषित केले होते. त्यानंतर मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.