पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PMC बँकेच्या जॉय थॉमसांचे कारनामे उघड, नाव बदलून पुण्यात १० मालमत्तांची खरेदी

जॉय थॉमस यांना अटक करण्यात आली आहे

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी गेल्या सात वर्षांच्या काळात पुण्यामध्ये विकत घेतलेल्या १० मालमत्तांचा आणि बँकेंतील गैरव्यवहारांचा काही संबंध आहे का, याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जातो आहे. विशेष म्हणजे जॉय थॉमस यांनी आपले नाव बदलून जुनैद खान केल्यानंतर या सर्व मालमत्ता खरेदी केल्या. या सर्व मालमत्तांवर जुनैद खान (जॉय थॉमस) यांच्यासोबत त्यांच्या दुसऱ्या पत्नीचेही नाव आहे. ही पत्नी आधी त्यांची सहायक म्हणून काम करीत होती.

पक्षाने काहीही निर्णय घेऊ द्या, मी काँग्रेस सोडणार नाहीः संजय निरुपम

२०१२ नंतर या सर्व मालमत्ता विकत घेण्यात आल्या असून त्यावर जॉय थॉमस यांचे आणि त्यांच्या पत्नीचे नाव आहे. पीएमसी बँकेतील पहिला गैरव्यवहार याच काळात समोर आला होता. त्यामुळेच या मालमत्ता खरेदी करणे आणि बँकेतील गैरव्यवहार यांचा संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे. जर तपासामध्ये या मालमत्तांचा आणि बँकेतील गैरव्यवहारांचा काही संबंध असल्याचे आढळल्यास या सर्व मालमत्ता जप्त केल्या जातील, असेही पोलिसांनी सांगितले.

वणीमधील सभेत राज ठाकरे यांची पृथ्वीराज चव्हाणांवर घणाघाती टीका

पीएमसी बँकेतील ४३५५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांप्रकरणी आतापर्यंत एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये जॉय थॉमस यांचाही समावेश आहे. चार ऑक्टोबर रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेच्या तपासणीतून हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिलेली कर्जे लपविल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पीएमसी बँकेने जेवढे कर्जवाटप केले आहे. त्याच्या ७३ टक्के कर्जे ही एकट्या हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिली असल्याचे दिसून आले आहे.