पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनः या कंपनीची मोठी घोषणा, २६ शहरांमध्ये देणार १० हजार रोजगार

मॉलमधील संग्रहित छायाचित्र

लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. अनेकांचा रोजगार गेला आहे. तरा अनेकांच्या रोजगारावर टांगती तलवार आहे. याचदरम्यान, एक खूशखबर आली आहे. किराणा सामान विकणारी ऑनलाइन कंपनी बिग बास्केट देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान प्रलंबित असलेल्या ऑर्डरच्या तत्परतेने डिलिव्हरीसाठी १० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीचे मनुष्यबळ विभागाच्या उपाध्यक्ष तनुजा तिवारी यांनी 'भाषा' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, आम्ही गोदाम तसेच डिलिव्हरीसाठी १० हजार लोकांना नोकरी देण्याचा विचार करत आहोत. या लोकांना आम्ही आमच्या सर्व २६ शहरांमध्ये नोकरी देणार आहोत. 

'मी मेणबत्ती पेटवणार नाही, भले मला देशद्रोही म्हणा'

त्या पुढे म्हणाल्या की, आता सर्वच शहरात दबाव जाणवत आहे. परंतु, टिअर-१ शहरांत हा दबाव अधिक आहे. देशात कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ई- कॉमर्स कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

एका धोबी व्यावसायिकामुळे सूरतमध्ये ५४००० लोक क्वारंटाइन
    
जरी सरकारने आवश्यक सामानांच्या डिलिव्हरीसाठी सूट दिली असली तरी कंपन्यांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंपनीने डिलिव्हरी वेगाने करण्यासाठी गुरुवारी उबरशी हातमिळवणी केली आहे.

मुले परराज्यात अडकली, ७० वर्षांच्या पत्नीनेच दिला पतीला अग्नी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jobs in recession Coronavirus lockdown Bigbasket to hire 10000 people for warehouses delivery