पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Jio ची धमाकेदार ऑफर; १९८, ३९९ रुपयांच्या रिचार्जवर मिळणार हे फायदे...

रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर बाजारात आणली आहे. रिलायन्स जिओच्या प्रिपेड ग्राहकांसाठी ही ऑफर असणार आहे. जर ग्राहकाने जिओचे १९८ किंवा ३९९ रुपयाचे रिचार्ज केले, तर त्याला तेवढ्याच रकमेचे अजिओचे कुपन मिळणार आहे. नव्या आणि जुन्या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी ही ऑफर उपलब्ध असणार आहे. ३ जून ते १४ जुलै २०१९ या काळात जिओचे रिचार्ज करणाऱ्यांना ही ऑफर उपलब्ध असेल.

अमिताभ बच्चन यांनी बिहारच्या २१०० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले

१९८ रुपयांचे रिचार्ज केल्यावर ग्राहकांना तेवढ्याच रकमेचे अजिओचे कुपन मिळेल. अजिओ या रिलायन्स उद्योग समूहातील वेबसाईटवरून ग्राहक कपड्यांसह इतर वस्तू खरेदी करू शकतात. हे कुपन ग्राहक पाचवेळा रिडिम करू शकणार आहेत. एका महिन्यात एकाच वेळेच या कुपनचा वापर करता येईल. त्याचबरोबर अजिओवर ९९९ रुपयांची खरेदी केल्यावरच या कुपनचा वापर करता येईल. हे कुपन मिळवण्यासाठी १४ जुलैपर्यंत रिचार्ज करणे बंधनकारक आहे.

१९८ बरोबरच ३९९ रुपयांचे रिचार्ज केल्यावरही तेवढ्याच रकमेचे अजिओचे कुपन ग्राहकांना मिळेल. या कुपनलाही या साईटवर पाच वेळा रिडिम करता येईल. हे कुपनसुद्धा महिन्यातून एकदाच वापरता येईल. या कुपनचा वापर करण्यासाठी किमान १३९९ रुपयांचे खरेदी करणे आवश्यक आहे.