पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Jio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन

Jio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन

रिलायन्स जियोने दिवाळीपूर्वी ग्राहकांना एक जबरदस्त भेट दिली आहे. कंपनीने जियो फोनचे दर घटवून केवळ ६९९ रुपये केली आहे. जियोकडून दिवाळीनिमित्त ग्राहकांना दिलेली सर्वांत किफायतशीर भेट देण्यात आली आहे. जियोने हा फोन जुलै २०१७ मध्ये १५०० रुपयांत लाँच केला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात कंपनीने एक्सचेंज ऑफर सुरु केली. त्याअंतर्गत हा फोन ५०१ रुपयांत देण्यात येत होता. पण आता दिवाळीनिमित्त पुन्हा एकदा हा फोन नव्या ऑफरसह बाजारात आणला आहे.

जियो फोन दिवाळी २०१९ ऑफरमध्ये फोनची किंमत ६९९ रुपये ठेवण्यात आली आहे. रिलायन्स जियोकडून जियो फोन चार्ज करण्यावर ग्राहकांना ७०० रुपयांचा फायदा होईल. या फोन बरोबर रिचार्जचे हे जबरदस्त ऑफर देण्यात आले आहेत. यामध्ये जर तुम्ही ८०० रुपये दिले तर जियो फोनबरोबर एक महिन्याचा अतिरिक्त डेटाही मिळेल. तर १००० रुपये दिल्यास ३ महिन्याचा डेटा मिळेल. 

कॅरीबॅगसाठी १८ रुपये घेतल्याने बिग बाजारला ११ हजारांचा दंड

जियो फोनच्या वैशिष्ट्याबाबत बोलायचे म्हटले तर सिंगल सिम जियोफोनमध्ये २.४ इंचचा क्यूडब्ल्यूव्हीजीए (२४०x३२० पिक्सल) डिस्प्ले आहे. यामध्ये १.२ गीगीहर्ट्ज स्प्रेडट्रम एसपीआरडी ९८२०ए/क्यूसी८९०५ ड्यूएल कोअर प्रोसेसरचा वापर झाला आहे. माली-४०० जीपीयू इंटिग्रेटेड आहे. त्याचबरोबर यामध्ये ५१२ एमबी रॅम आहे. इनबिल्ट स्टोरेज ४ जीबी आहे आणि १२८ जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डचा वापर करता येईल.

त्याचबरोबर मागच्या बाजूला २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. समोरच्या बाजूला व्हीजीए कॅमेरा आहे. जियो फोनची बॅटरी २००० एमएएच आहे. पण फोनच्या दृष्टीने ती योग्य आहे. कनेक्टिव्हिटी फीचरमध्ये ४जी व्हीओएलटीई, ब्लूटूथ वी ४.१ , वाय-फाय, एनएफसी, एफएम रेडिओ, जीपीएस आणि यूएसबी २.० सपोर्टचा समावेश आहे.

बजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का ?