पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Jio GigaFiber ग्राहकांना 'फर्स्ट डे, फर्स्ट शो' पाहता येणार

मुकेश अंबानी

रिलायन्स जिओ गिगाफायबरच्या ग्राहकांसाठी खूशखबर आहे. आता कोणताही नवीन चित्रपट रिलिज झाल्यानंतर ग्राहकांना फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहता येणार आहे. रिलायन्स जिओची ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी जिओ गिगाफायबरवर नवीन चित्रपट रिलिज होईल असे जाहीर केले. म्हणजेच गिगाफायबरचे ग्राहक फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहू शकतील. प्रिमियम कस्टमर्सच रिलिज झालेला नवा चित्रपट पाहू शकतील. लवकरच त्याची विस्तृत माहिती लवकरच समोर येईल. मुकेश अंबानींनी म्हटले की, ५ सप्टेंबरला जिओ गिगाफायबरचे लाँचिंग होईल.

Reliance Jio GigaFiberची प्रतीक्षा संपली, ७०० रुपयांपासून प्लॅन्स

४ के सेटटॉप बॉक्स मोफत

जिओ गिगाफायबरच्या प्लॅनची सुरुवात ७०० रुपयांपासून होईल आणि त्याची रेंज १० हजार रुपयांपर्यंत असेल. जिओच्या फायबर ऍन्यूएल ऑफर अंतर्गत ४ डी/ ४ के टेलिव्हिजन सेट आणि ४ के सेटटॉप बॉक्स मोफत मिळेल. त्याचबरोबर जिओच्या मिक्स रिऍल्टी (एमआर) सादर केले जाईल. त्याचे नाव जिओ होलोबोर्ड असेल.

गेमिंगची मजा

जिओ सेटटॉप बॉक्स आणि गिगाफायबरच्या मदतीने हाय क्वॉलिटी व्हिडिओ कॉलिंग आणि कॉन्फरन्स करता येऊ शकते. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्णपणे मोफत राहणार आहे. सेटटॉप बॉक्समध्ये गेमिंगसाठी खास फिचर देण्यात आले आहे. यामुळे मल्टि प्लेअर गेमिंग आणि सोशल गेमिंगचा रोमांच वाढणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगातील कोणत्याही ठिकाणी असलेल्या मित्र आणि कुटुंबाबरोबर गेमिंगची मजा घेऊ शकता. कंपनीने शानदार गेमिंगसाठी जगातील टॉप गेम डेव्हल्पर्सशी भागिदारी केली आहे. 

मुकेश अंबानींनी केली जिओ फायबरची घोषणा, ५ सप्टेंबरला लाँच

हायस्पीड इंटरनेट मिळणार

कंपनीने गिगाफायबर ग्राहकांसाठी ७०० रुपयापासून ते १० हजार रुपयांपर्यंत प्लॅन ऑफर मिळणार आहेत. यामध्ये सर्वांत कमी किमतीच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला १०० एमबीपीएस ते प्रिमियम प्लानमध्ये १ जीबीपीएस स्पीड मिळेल. कंपनी जिओफायबर पुढील वर्षभरात संपूर्ण देशभरात उपलब्ध करुन देईल.