पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JIOच्या ग्राहकांना बसणार झटका, मोबाइल सेवा महागणार

रिलायन्स जिओ फायबर

स्वस्त डाटा आणि कॉल्सचा काळ लवकरच संपुष्टात येणार आहे. रिलायन्स जिओकडूनही पुढील काही आठवड्यात मोबाइल दर वाढवण्याची शक्यता आहे. कंपनीने मंगळवारी याची घोषणा केली. तत्पूर्वी, सोमवारी एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया दि. १ डिसेंबरपासून दर वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. जिओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रायच्या निर्णयाच्या आधारावर यावर विचार केला जाईल. दूरसंचार उद्योगाकडून ट्रायकडे दर वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. जर ट्रायने दर वाढवण्याचा निर्णय घेतला तर त्यावर अंमलबजावणी करावी लागेल. पंरतु, दर वाढल्याने डाटाच्या विक्रीवर काही परिणाम होणार नसल्याचे जिओने स्पष्ट केले आहे. 

एक दिवसांपूर्वीच व्होडाफोन-आयडियाकडून जारी करण्यात आलेल्या निवदेनात १ डिसेंबरपासून मोबाइल सेवांचे दर वाढणार असल्याचे म्हटले होते. कंपनीने आर्थिक संकटाचे कारण यामागे दिले आहे. पण दरात किती वाढ केली जाईल, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. एअरटेलनेही डिसेंबरपासून आपल्या सेवांमध्ये वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

कोणाकडे सर्वाधिक ग्राहक

३७.२४ कोटी व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक

३५.५२ कोटी जिओचे ग्राहक

३२.५५ कोटी एअरटेलचे ग्राहक

जिओचे ग्राहक वाढले, व्होडाफोन-आयडियाचे घटले

ट्रायच्या आकडेवारीनुसार, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने सप्टेंबर महिन्यात एकूण ४९ लाखांहून अधिक ग्राहक गमावले आहेत. तर रिलायन्स जिओने यादरम्यान ६९.८३ लाख नवीन ग्राहक जोडले. आकडेवारीनुसार, एअरटेलने या दरम्यान २३.८ लाख, व्होडाफोन-आयडियाने २५.७ लाख ग्राहक गमावले.

तीन वर्षांत डाटाचे ९५ टक्के दर झाले कमी

ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, जून २०१६ पासून ते डिसेंबर २०१७ दरम्यान देशात मोबाइल डाटाच्या दरात ९५ टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. आता मोबाइल डाटा ११.७८ रुपये प्रती जीबीच्या दराने उपलब्ध आहे. मोबाइल कॉलचे दरही ६० टक्क्यांनी कमी होऊन सुमारे १९ पैसे प्रती मिनिट झाले आहेत.