पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी पुढील वर्षही सशुल्क कॉल्सचे, वाचा कारण..

रिलायन्स जिओ फायबर

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिलायन्स जिओच्या मोबाईलवरून इतर नेटवर्कच्या मोबाईलवर फोन करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेले आंतरजोडणी शुल्क आणखी वर्षभर द्यावे लागणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आंतरजोडणी शुल्क वसुल करण्याच्या मर्यादेत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे आणखी वर्षभर ग्राहकांना हे पैसे द्यावे लागतील. सुरुवातीला आंतरजोडणी शुल्काचे पैसे जिओ ग्राहकांकडून वसुल करीत नव्हता. पण ऑक्टोबरपासून हे पैसे ग्राहकांकडून घेण्यास सुरुवात करण्यात आली.

सुधारित नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आंतरजोडणी शुल्क रद्द करण्याचा विषय आणखी एक वर्षासाठी लांबणीवर टाकला आहे. सध्या एका नेटवर्कच्या मोबाईलधारकाने दुसऱ्या नेटवर्कच्या मोबाईलवर फोन केल्यास त्याला प्रति मिनिट ६ पैसे इतके शुल्क द्यावे लागते. रिलायन्स जिओने हे शुल्क आता ग्राहकांकडून वसुल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिओच्या मोबाईलवरून इतर नेटवर्कवर फोन केल्यास आता ग्राहकांना त्याचे पैसे द्यावे लागतात.

धावत्या लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी

आंतरजोडणी शुल्क रद्द केल्यानंतर रिलायन्स जिओच्या मोबाईलवरून इतर मोबाईल नेटवर्कवर फोन केल्यास ते ग्राहकांना मोफत दिले जाण्याची शक्यता होती. पण आता दूरसंचार नियामक प्राधिकरणाने या आंतरजोडणी शुल्कात एक वर्षाची वाढ केल्याने ग्राहकांना त्यांच्या इतर नेटवर्कवरील फोन कॉलसाठी पुढील वर्षभर पैसे द्यावे लागणार आहेत.