पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझॉस यांनी घेतला मोठा निर्णय

जेफ बेझॉस

अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी त्यांच्याकडील कंपनीचे ९९ कोटी डॉलरचे शेअर्स गेल्या गुरुवारी आणि शुक्रवारी विकले. गेल्या आठवड्याभरात त्यांनी आपल्याकडील अ‍ॅमेझॉनचे तब्बल २.८ अब्ज डॉलरचे शेअर्स विकले आहेत.

... हा तर सत्तेचा गैरवापर, राहुल गांधींची कलम ३७० वरून सरकारवर टीका

जुलै महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांत जेफ बेझॉस यांनी १.८ अब्ज डॉलरचे शेअर्स विकले होते. सिक्युरिटीज अ‍ॅंड एक्स्चेंज कमिशनकडे दाखल केलेल्या विवरणपत्रावरून ही माहिती पुढे आली आहे. यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अ‍ॅमेझॉनने नकार दिला आहे. 

अखंड हिंदुस्थानचे निम्मे स्वप्न पूर्ण झाले, शिवसेनेकडून सरकारचे कौतुक

राकेट कंपनी ब्लू ओरिजिनसाठी आपण दरवर्षी एक अब्ज डॉलरचे शेअर्स विकणार आहोत, असे जेफ बेझॉस यांनी गेल्यावर्षीच जाहीर केले होते. जेफ बेझॉस यांनी घटस्फोट दिलेली पत्नी मॅकेंन्झी बेझॉस यांच्याकडे सध्या अ‍ॅमेझॉनचे ३७ अब्ज डॉलरचे शेअर्स आहेत. एवढ्या मोठ्या रकमेचे शेअर्स असलेल्या त्या दुसऱ्या क्रमांकाच्या वैयक्तिक शेअरधारक आहेत.