पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती स्थानावरून खाली

जेफ बेझॉस

ऍमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती या स्थानावरून एक पाऊल खाली उतरले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स या स्थानावर जाऊन बसले आहेत. ऍमेझॉनचे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये जेफ बेझॉस यांचे शेअर्समधील उत्पन्नात ७ अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. 

जनतेनं म्हटलंय, माज दाखवाल तर याद राखा, सेनेचा घरचा आहेर

गुरुवारी दुपारच्या सत्रामध्ये ऍमेझॉनच्या शेअर्समध्ये ७ टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसले. यामुळे जेफ बेझॉस यांची संपत्ती १०३.९ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी बिल गेट्स यांची संपत्ती १०५.७ अब्ज डॉलर इतकी आहे. 

महाराष्ट्र आणि हरियाणातील निकालांनंतर भाजपला आणखी एक धक्का

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती या स्थानावर २४ वर्षांपासून असलेले बिल गेट्स गेल्यावर्षी पहिल्यांदा एक स्थान खाली उतरले होते. त्यावेळी जेफ बेझॉस या स्थानावर पोहोचले होते. पण यावेळी पुन्हा एकदा जेफ बेझॉस खाली उतरले. ऍमेझॉनच्या निव्वळ उत्पन्नात तिसऱ्या तिमाहीमध्ये २६ टक्क्यांची घट झाली. २०१७ नंतर पहिल्यांदाच ऍमेझॉनच्या नफ्यात घट झाल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.