पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकारला दिलासा, GST उत्पन्नात जानेवारीत मोठी वाढ

जीएसटी

केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी केल्यानंतर जानेवारी २०२० मध्ये दुसऱ्यांदा त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाने १.१० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. जानेवारी २०२० मध्ये जीएसटीतून सरकारला १,१०,८२८ कोटी रुपये इतके उत्पन्न मिळाले. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर जीएसटी उत्पन्नाने १.१० लाख कोटींचा टप्पा ओलांडणे सरकारसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

वडिलांच्या निधनानंतरही त्या अधिकाऱ्याकडून कर्तव्याला प्राधान्य

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२० मध्ये सीजीएसटी (केंद्र) एकूण २०९४४ कोटी, एसजीएसटीतून (राज्य) एकूण २८२२४ कोटी, आयजीएसटीतून ५३०१३ कोटी तर अधिभारातून (सेस) ८६३७ कोटी रुपयांचे उत्पन्न केंद्र सरकारला मिळाले. 

अर्थसंकल्प २०२० : ... या मुद्द्यांकडे असणार सर्वांचे लक्ष

केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा टप्पा सहाव्यांदा एक लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. जानेवारी २०१९ च्या तुलनेत जानेवारी २०२० मध्ये जीएसटीच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशीही माहिती सरकारकडून देण्यात आली. जीएसटीच्या माध्यमातून डिसेंबर २०१९ मध्ये १.०३ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.