पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अलिबाबा'तून जॅक मा पायउतार होणार, वाचा त्यांच्या भन्नाट कारकीर्दीविषयी...

जॅक मा

चीनमधील ऑनलाईन क्षेत्रातील दिग्गज अलिबाबा समूहाचे कर्ता-धर्ता जॅक मा मंगळवारी वयाच्या ५५ व्या वर्षी पायउतार होत आहेत. अलिबाबा समूहाची सूत्रे डॅनियल झांग यांच्याकडे सोपवून जॅक मा पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत होणार आहेत. जॅक मा वयाच्या ५५ व्या वर्षी अलिबाबातून अधिकृतपणे पायउतार होणार हे आधीच जाहीर कऱण्यात आले होते. या कंपनीच्या निर्मितीमध्ये आणि संपूर्ण जगाचे लक्ष तिच्याकडे वेधून घेण्यामध्ये जॅक मा यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

जॅक मा या क्षेत्रात येण्यापूर्वी शिक्षणाच्या क्षेत्रातच कार्यरत होते. त्यांना शिक्षणाबद्दल आजही आवड आहे. त्यामुळेच त्यांनी पुढील काळात विद्यादानाच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. एक गरीब शिक्षक ते कोट्यवधी रुपयांचे साम्राज्य उभा करण्याचा जॅक मा यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असाच आहे. जॅक मा यांच्याकडे सध्या ४१ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. आपली संपत्ती शिक्षणाच्या क्षेत्रात खर्च करण्याचे त्यांचे नियोजन आहे.

चांद्रयान २ : विक्रम लँडरसंदर्भात इस्रोने जारी केली नवी माहिती

जॅक मा यांनी लहानपणी कधीही कॉम्प्युटरचा वापर केलेला नव्हता. बिल गेट्स आणि स्टिव्ह जॉब्स यांच्याप्रमाणे त्यांच्याकडे या क्षेत्रातील कोणती पार्श्वभूमी नव्हती. गणिताच्या पेपरमध्ये त्यांना एकदा १२० पैकी केवळ एक गुण मिळाला होता. १९८० मध्ये स्वतःच्या शहरात शिक्षक म्हणून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. तीन वर्षांनंतर त्यांनी ती नोकरी सोडली आणि अनुवाद करण्याचे काम सुरू केले.

१९९४ मध्ये कामानिमित्त अमेरिकेला गेल्यावर तिथे इंटरनेट बघून ते आचंबित झाले होते. घरी बसून लोक आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी संवाद साधतात, हे त्यांना खूप आवडले होते. इंटरनेटबद्दलच्या प्रेमामुळेच ते चीनमध्ये 'मिस्टर इंटरनेट' म्हणून ओळखले जाऊ लागले.

कॅन्सरवर मात देऊन ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर परतले भारतात

एकूण ३० कंपन्यांनी जॅक मा यांना नोकरी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी अलिबाबा ही स्वतःची कंपनी सुरू केली आणि त्यामध्ये जगाचे डोळे दिपवून टाकणारे यश संपादन केले. २१ फेब्रुवारी १९९९ मध्ये जॅक मा यांनी अलिबाबाची सुरुवात केली. यावेळी १७ मित्रांनी त्यांना मदत केली होती. सुरुवातीच्या काही अडचणींवर मात केल्यावर त्यांच्या कंपनीने वेगाने विकास केला.