पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IRTC च्या तिकीट दरात वाढ, १ सप्टेंबरपासून नवे दर

IRTC तिकीटांसाठी मोजावे लागणार अधिक रक्कम

रेल्वेने प्रवास करण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना ऑनलाईन बुकींगसाठी आता पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. १ सप्टेंबरपासून ऑनलाईन कोट्यातील राखीव तिकीटांवर सेवा कर पुन्हा लागू करण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे आयआरटीसीकडून ऑनलाईन बुकींगसाठी २० ते ४० रुपये आगाऊ आकारण्यात येतील.

नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीच्या निर्णयानंतर डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशाने ई-तिकीटांवर लागू करण्यात येणारा सेवा कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे ई-तिकीट सेवेला फायदा होईल, असा दावा करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरम्यानच्या काळात ई-तिकीटच्या माध्यमातून ५० ते ६० टक्के व्यवहार झाला. २०१६ मध्ये हा आकडा ३५ ते ४० टक्केच्या घरात होता. जवळपास देशभरात ११ ते १२ लाख तिकीटे राखीव कोट्यातून बुक होतात. यावर आता पुन्हा सेवा कर लागू करण्यात येणार आहे.

सुधारित ऑनलाईन तिकीट दरासंदर्भात थोडक्यात माहिती 

#सीटर कम स्लीपर (आसन व शयनयान सुविधा) २० रुपये सेवाकर आकारण्यात येईल. 
#वातानुकूलित सीटर कम स्लीपर (आसन व शयनयान सुविधा) बोगीसाठी ४० रुपये सेवाकर आकारण्यात येईल. 
#भीमअ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना स्लीपरसाठी (आसन व शयनयान सुविधा) १० रुपये सेवाकर द्यावा लागेल.  
#भीमअ‍ॅपच्या माध्यमातून वातानुकूलित सुविधेसाठी प्रवाशांना २० रुपये सेवाकर द्यावा लागेल.