पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, SBI करणार २४५० कोटींची गुंतवणूक

एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार  (ANI)

संकटग्रस्त येस बँकेला वाचवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) प्रयत्न सुरु केले असून त्यांनी यासाठी एक योजनाही सांगितली आहे. एसबीआय येस बँकेचे ४९ टक्के शेअर्स खरेदी करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर २४५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचीही योजना आहे. एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनीही सध्या खातेधारकांच्या पैशाला कोणताच धोका नसून तो सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 

रजनीश म्हणाले की, सध्या ५० हजारांची मर्यादा निश्चित केल्याने येस बँकेच्या खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, घाबरण्याचे काहीच कारण नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही लोकांना विश्वास दिला आहे. सध्या सर्वांना त्रास होतोय. मात्र, सर्वांचा पैसा सुरक्षित आहे. 

ईडीकडून येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या वरळी निवासस्थानी छापेमारी

पत्रकार परिषदेत रजनीश कुमार यांनी म्हटले की, सध्या येस बँकेला २० हजार कोटींची गरज आहे. सध्या २४५० रुपये कोटींची गुंतवणूक करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

दरम्यान, खासगी क्षेत्रातील येस बँक गेल्या काही काळापासून बुडीत कर्जाच्या समस्येला सामोरे जात होती. बँकिंग नियमांचे अनुपालन करत बँकेला दोन अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. परंतु, मागील दोन वर्षांपासून अनेक गुंतवणूकदारांशी बोलणी करुनही रक्कम जमा करण्यास बँकेला यश आले नाही. 

येस बँकेच्या ठेवीदारांचे पैसे सुरक्षित, चिंता नको - निर्मला सीतारामन

सहा महिन्यांपूर्वी आरबीआयने मोठा घोटाळा समोर आल्यानंतर पीएमसी बँकेप्रकरणी अशाच पद्धतीने पाऊल उचलले होते.