पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑक्टोबरमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत घट

म्युच्युअल फंड (प्रतिकात्मक छायाचित्र)

केंद्र सरकारच्या अनेक सुधारात्मक निर्णयानंतर आणि शेअर बाजारातील तेजीनंतरही इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतील प्रवाह ऑक्टोबरमध्ये मागील पाच महिन्यांच्या निचांकी स्तरावर आला आहे. ऑक्टोबरमध्ये या श्रेणीच्या म्युच्युअल फंडात ६,०१५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. 

तुमच्या PF खात्यामध्ये व्याज जमा झाले? घरबसल्या असा पाहा बॅलन्स

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (एएमएफआय) आकडेवारीनुसार खुल्या इक्विटी योजनांमध्ये ६,०२६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर एका निश्चित कालावधीच्या योजनांमधून ११ कोटी रुपये काढण्यात आले. अशाच पद्धतीने एकूण गुंतवणुकीचा प्रवाह ६१५ कोटी रुपये राहिला. 

नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर आता राहुल गांधी म्हणतात...

यापूर्वी सप्टेंबरमध्ये इक्विटी आणि इक्विटीशी निगडीत बचत योजनांमध्ये ९,०९० कोटी रुपये, जुलैमध्ये ८,०९२ कोटी रुपये, जूनमध्ये ७,५८५ कोटी रुपये तर मेमध्ये ४,९६८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. परंतु, शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा प्रवाह ऑक्टोबरमध्ये घटला आहे.

मोदी सरकारला आणखी झटका, मूडीजकडून आर्थिक रेटिंगमध्ये 'नकारात्मक' असा बदल