पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्वसामान्यांना धक्काः पीपीएफ, सुकन्या समृद्धीच्या व्याजदरात कपात

व्याजदरांत कपात

राष्ट्रीय बचत खाते (एनएससी) आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंडसह (पीएफ) इतर छोट्या बचतीवर सरकारने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी व्याजदरात ०.१० टक्क्यांची कपात केली आहे. बँकिंग क्षेत्रातील व्याज दर कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर्षी तीन वेळा आपल्या दरात एकूण ०.७५ ची कपात केली आहे. 

PF वरील व्याजदर कमी करण्याची अर्थ मंत्रालयाची मागणी

बचत खात्यावरील जमा व्याजदर वगळता सरकारने इतर सर्व योजनांवरील व्याजदर ०.१० टक्क्यांनी घटवले आहे. बचत खात्यावर व्याज दर वार्षिक ४ टक्केच राहिल. अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०१९-२० च्या दुसऱ्या तिमाहीसाठी सुधारित व्याजदरांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

पीपीएफ आणि एनएससी वर व्याज

या कपातीनंतर आता पीपीएफ आणि एनएससीवर वार्षिक व्याजदर ७.९ टक्के होईल. सध्या सरकार ८ टक्के व्याज देते. तर ११३ महिन्यांच्या किसान विकास पत्र (केव्हीएफ) वर ७.६ टक्के व्याज मिळेल. सध्या ११२ महिन्यासाठी ७.७ टक्के व्याज आहे.

प्राप्तिकर परताव्याच्या बनावट ईमेल्सचा सुळसुळाट, सावध राहण्याचे आवाहन

सुकन्या समृद्धी खात्यावर आता ८.४ टक्के व्याज मिळेल. सध्या ८.५ टक्के व्याजदर आहे. एक ते तीन वर्ष कालावधीच्या जमावर ६.९ टक्के आणि पाच वर्षांच्या कालावधीत ७.७ टक्के दराने व्याज मिळेल. आवर्ती जमासाठी व्याज ७.३ टक्के ऐवजी ७.२ टक्के होईल. पाच वर्षांच्या वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज आता ८.७ टक्क्यांऐवजी ८.६ टक्के असेल. या सर्वांची अंमलबजावणी ही दि. १ जुलैपासून होईल.

व्हॉट्सअ‍ॅपने होणार पैशांची देवाण-घेवाण, ५ नवे फिचर्स येणार