पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केंद्राकडून पीएफवरील व्याज दरात घट; ६ कोटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका

सरकारी कर्मचारी

देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी निराशजनक बातमी आहे. केंद्र सरकारने पीएफवरील व्याज दरात घट केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.५ टक्के व्याजदर घोषीत करण्यात आला आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली आहे. व्याजदरात घट झाल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) जवळपास ६ कोटींपेक्षा जास्त खातेदारांना मोठा धक्का बसला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळा: मुख्यमंत्री

आर्थिक वर्ष २०१९-२०२० च्या पीएफ व्याजदरामध्ये घट करण्यात आली आहे. पीएफवरील व्याजदर ८.६५ टक्क्यांवरुन आता ८.५ टक्के करण्यात आला आहे. नवा व्याजदर हा गेल्या ७ वर्षातला सर्वात कमी व्याजदर आहे. याआधी आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये पीएफवरील व्याजदर ८.५ टक्के एवढा होता. 

फ्लिपकार्टचे सचिन बन्सल यांच्याविरोधात पत्नीची तक्रार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने गुंतवणुकीवर कमी परतावा मिळाल्यामुळे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरामध्ये दीर्घकालीन एफडी, बाँड आणि सरकारी सिक्युरिटीजमधून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेनेला मिळणाऱ्या परताव्यामध्ये ५०-८० बेसिस पॉइंटनी घट झाली आहे.

'कोरोना केवळ शहरांमध्ये, ग्रामीण भाग सुरक्षित'