पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्फोसिसला धक्का; कॅलिफोर्नियाला ८,००,००० डॉलर द्यावे लागणार

इन्फोसिस कंपनी

परदेशात कामासाठी कर्मचारी पाठवताना तेथील कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील दिग्गज कंपनी इन्फोसिसला कॅलिफोर्नियातील प्रशासनाला आठ लाख डॉलरची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. कॅलिफोर्नियातील ऍटर्नी जनरल यांच्या कार्यालयाकडून ही माहिती मंगळवारी देण्यात आली. 

नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, थोडक्यात बचावले

इन्फोसिसकडून चुकीच्या व्हिसाचा वापर करून भारतातील कर्मचाऱ्यांना कॅलिफोर्नियात पाठविण्यात आले. कॅलिफोर्निया प्रशासनाला कररुपाने द्यावे लागणारे शुल्क कमी लागावे, यासाठी हे करण्यात आले, असा आरोप ठेवण्यात आला होता. कॅलिफोर्नियात काम करण्यासाठी जे नियम आहेत. त्यामध्ये बेरोजगारी विमा, अपंगत्व विमा आणि रोजगार प्रशिक्षण कर यांचा समावेश आहे. यांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप होता. ऍटर्नी जनरल झेविअर बेकेरा यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

इन्फोसिसचे सुमारे ५०० कर्मचारी कॅलिफोर्नियात काम करीत होते. त्यांच्यासाठी बी-१ व्हिसा देण्यात आला होता. वास्तविक या कर्मचाऱ्यांसाठी एच-१बी व्हिसा देण्याची विनंती करायला हवी होती. २००६ ते २०१७ या कालावधीत हे कर्मचारी काम करीत होते. एच-१बी व्हिसानुसार कर्मचाऱ्यांना काही स्थानिक वेतन कंपनीकडून देय असते. त्याचाही यामध्ये भंग करण्यात आला, असे सांगण्यात आले आहे.

मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या संदर्भात इन्फोसिसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेकडून त्यांना मेलही पाठविण्यात आला होता. पण त्याला उत्तर देण्यात आले नाही. इन्फोसिसचे वार्षिक उत्पन्न ११ अब्ज डॉलर इतके असून, कॅलिफोर्निया प्रशासनाचे झालेले नुकसान भरून निघणार असल्याचे झेविअर बेकेरा यांनी सांगितले.