पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Infosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले

Infosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले

माहिती तंत्रज्ञानातील (आयटी) आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसचे शेअर्स मंगळवारी सुमारे १७ टक्क्यांनी कोसळले. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ५३,४५१ कोटी रुपयांची घसरण झाली आहे. एका व्हिसलब्लोअरच्या तक्रारीनंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख आणि मुख्य वित्त अधिकारी नीलांजल रॉय यांच्यावर कमी कालावधीत उत्पन्न आणि नफ्याचे आकडे फुगवल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली.

नरेंद्र मोदींची भेट अनोखा अनुभव - अभिजित बॅनर्जी

शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये १६.२१ टक्क्यांच्या नुकसानीमुळे ६४३.३० रुपयांवर आला होता. निफ्टीमध्ये कंपनीचे शेअर्स १६.६५ टक्क्यांनी घसरले आणि ६४० रुपयांवर बंद झाले.  

शेअरमधील जोरदार घसरणीमुळे कंपनीचे बाजार भांडवल ५३,४५०.९२ कोटी रुपयांनी कमी होऊन २,७६,३००.०८ कोटी रुपयांवर आले. कंपनीची ऑडिट समिती व्हिसलब्लोअरच्या तक्रारीवर स्वतंत्र चौकशी करेल, असे इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलकेणी यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे.

परस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही-कोर्ट