पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्फोसिस कंपनी १० टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ

इन्फोसिस कंपनी

माहिती तंत्रज्ञानातील (आयटी) आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिस कंपनीने १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. काही दिवसांपूर्वी कॉग्निझंट कंपनीनेन सुध्दा कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची घोषणा केली होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इन्फोसिस कंपनी आपल्या जॉब लेवल-६ (जेएल-६) विभागातील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकणार आहे. 

काळजीवाहू सरकारला महाराष्ट्राची काळजी नाही: बाळासाहेब थोरात

जॉब लेवल ६ ते जॉब लेवल ८ मध्ये कंपनीमध्ये तब्बल ३० हजार कर्मचारी काम करतात. या व्यतिरिक्त  कंपनीत जॉब लेवल ३ आणि त्याच्या खालील विभागातील ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. या कंपनीत सहकारी आणि मध्यम स्तरावर जवळपास एक लाख कर्मचारी आहे. त्याचप्रमाणे सहाय्यक उपाध्यक्ष ते कार्यकारी उपाध्यक्ष अशा पदावर जवळपास ५० अधिकाऱ्यांना कामावरुन काढून टाकले जाऊ शकते. 

'युतीला बहुमत असल्याने भाजप-सेनेनेच सत्ता स्थापन करावी'

दरम्यान, अमेरिकेची आयटी कंपनी कॉग्निझंटने मागच्या आठवड्यात जवळपास १३ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची घोषणा केली होती. तर ही कंपनी येत्या तिमाहीत वरिष्ठ स्तरावरील सुमारे ७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार आहे. कॉग्निझंट कंपनीने हे देखील सांगितले आहे की, ती कंटेन्ट ऑपरेशनचा व्यवसाय देखील बंद करणार आहे आणि त्याचा परिणाम सहा हजार कर्मचार्‍यांवर होणार आहे. अशाप्रकारे, या कंपनीच्या सुमारे १३ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. 

युतीवर गिरीश महाजन म्हणाले, आपण हिंदुस्थान-पाकिस्तान