पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना इम्पॅक्ट : दोन विमान कंपन्या मोठा निर्णय घेण्याच्या विचारात

इंडिगोची विमाने

कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे परिणाम दिसू लागले आहेत. कोरोनामुळे लोक घरीच थांबण्याला प्राधान्य देत असल्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळेच हवाई वाहतूक क्षेत्रातील दोन कंपन्या आपली विमान उड्डाण मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

कोरोनामुळे ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षा स्थगित

इंडिगो विमान कंपनीच्या देशांतर्गत प्रवासी संख्येत ३० टक्के घट झाली आहे. त्याचवेळी केंद्र सरकारच्या निर्देशांमुळे कंपनीची आंतरराष्ट्रीय वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे कंपनी काही गंभीर निर्णय घेण्याच्या विचारात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे विस्ताराने आपल्या पहिल्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर्सची डिलिव्हरी घेणे पुढे ढकलले आहे, अशी माहिती आणखी एका अधिकाऱ्याने दिली.

देशातील एकूण परिस्थिती पाहता या दोन्ही विमान कंपन्या येत्या काळात आपली काही विमान उड्डाणे रद्द करू शकते. ब्रिटिश एअरवेजनही आपली काही विमान उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुबईमधून परतलेल्या गोव्याच्या माजी मंत्र्यांचा विलग होण्यास नकार

सध्या तरी कोणत्याही विमान कंपनीने देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात केलेली नाही. पण येत्या काळात परिस्थिती बघून काही गंभीर निर्णय घ्यावी लागू शकतो.