पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वस्तात विमान प्रवासासाठी इंडिगोची धमाकेदार ऑफर

इंडिगोची विमाने

२०१९ वर्षाची अखेर होण्यास काही दिवस बाकी असताना खासगी विमान कंपनी इंडिगोने प्रवाशांसाठी एक धमाकेदार योजना आणली आहे. प्रवाशांना कमीत कमी पैशात विमान प्रवास करता यावा, यासाठी इंडिगोने 'द बिग फॅट इंडिगो सेल' आणला आहे. यामध्ये प्रवाशांना देशांतर्गत प्रवासाचे विमान तिकीट कमीत कमी ८९९ रुपयांत तर परदेशातील विमान प्रवासाचे तिकीट कमीत कमी २९९९ रुपयांत मिळणार आहे. इंडिगोने आपल्या वेबसाईटवर याबद्दल माहिती दिली आहे.

'महाराष्ट्रानंतर झारखंडही गमावलं, भाजपला आत्मचिंतनाची गरज'

या योजनेचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना आजपासूनच आपले विमानाचे तिकीट आगाऊ आरक्षित करावे लागणार आहे. १५ जानेवारी ते १५ एप्रिल २०२० या कालावधीतच प्रवाशांना या योजनेद्वारे प्रवास करता येईल. प्रवाशांना आजपासून (२३ डिसेंबर) २६ डिसेंबरपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी बुकिंग करता येईल. 

इंडिगोकडून ८९९ आणि २९९९ रुपयांचे देऊ करण्यात आलेल्या विमान तिकीटामध्ये करांचाही समावेश करण्यात आला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून या कंपनीच्या विमानाचे तिकीट घेताना ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल. जर प्रवाशांनी इंडिगोच्या वेबसाईटवरून विमानाचे तिकीट काढल्यास त्यांना कन्व्हेनिअन्स शुल्कही द्यावे लागणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. 

Jharkhand: भाजपला का बसला झटका, ही आहेत १० कारणे

कंपनी नेमकी किती तिकीटे स्वस्तात वाटणार आहे, याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. फक्त खूप कमी तिकीटे या योजनेत उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.