पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दोन महिन्यांत मुकेश अंबानींच्या संपत्तीत १ लाख ४४ हजार कोटींची घट

नीता अंबानी आणि अनिल अंबानी (PTI File )

कोरोना विषाणूच्या कचाट्यात जगातील मोठमोठे दिग्गज सापडले आहे. या विषाणूमुळे कोणी आजारी पाडले आहे तर अनेक उद्योगपतींना आर्थिक धक्का दिला आहे. कोरोना विषाणूचा फटका भारतातील सर्वांधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांना बसला आहे. त्यांच्या संपत्तीत मागील दोन महिन्यात २८ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टच्या मते अंबानी यांची संपत्ती दररोज ३०० मिलियन डॉलरने (३० कोटी) कमी होऊन ३१ मार्चला ४८ बिलियन डॉलर पर्यंत आली. त्यांची संपत्ती सुमारे १ लाख ४४ हजार कोटी रुपयांची घटून ती ३ लाख ६५ हजार कोटी रुपये झाली आहे. अंबानी यांच्याशिवाय गौतम अदानी, शिव नाडर आणि उदय कोटक यांच्या संपत्तीतही घट नोंदवण्यात आली आहे. 

कोरोनाविरोधात उद्योगपती मुकेश अंबानी-नीता अंबानींची मोदींना साथ

अंबानी आठव्या स्थानावरुन घसरुन १७ व्या स्थानी

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत कमी होण्याचे मोठे कारण हे शेअर बाजारातील मोठी घसरण हे आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष आणि एमडींच्या संपत्तीत फेब्रुवारी-मार्चच्या कालावधीत १९ अब्ज डॉलर कमी नोंदवण्यात आले. यामुळे ते जगभरातील श्रीमंतांच्या यादीत आठव्या स्थानवरुन १७ व्या स्थानी आले आहेत. 

देशातील ४०६७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७६ टक्के पुरुष

अदानींच्या संपत्तीत ३७ टक्क्यांची घट

या अहवालानुसार अदानी यांच्याही संपत्तीत ६ अब्ज डॉलर (३७ टक्के), एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नाडर यांची संपत्ती ५ अब्ज डॉलर (२६ टक्के) आणि बँकर उदय कोटक यांच्या संपत्तीत ४ अब्ज डॉलरची (२८ टक्के) घसरण झाली आहे. या नव्या यादीतून भारतातील तीन उद्योगपती जगातील १०० श्रीमंत व्यक्तींच्या सूचीतून बाहेर पडली आहेत. यात आता फक्त एकटे अंबानी हेच उरले आहेत.

मशिदीत लपलेल्या ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Indias richest man Mukesh Ambani networth down by 28 pct gautam adani shiv nadar uday kotak out from top 100 list