पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाहन उद्योगाचे बुरे दिन अद्याप कायम, विक्रीचा आलेख खालच्या दिशेने

गाड्यांच्या विक्रीत घट

गेल्या काही दिवसांपासून बुरे दिन सुरू असलेल्या देशातील वाहन उद्योग क्षेत्राला अजूनही चांगले दिवस आल्याचे आकडेवारीवरून दिसत नाही. देशातील प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांच्या विक्रीमध्ये सप्टेंबरमध्ये गेल्यावर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत २३.६९ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. यंदाच्या वर्षी सप्टेंबरमध्ये २२३३१७ एवढ्या गाड्या विकल्या गेल्या आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात हाच आकडा २९२६६० इतका होता. सलग अकराव्या महिन्यात प्रवासी गाड्यांच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसले आहे.

रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तक शिवेंदर आणि मालविंदर सिंग यांना अटक

कारच्या विक्रीमध्येही घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. सप्टेंबरमध्ये देशात एकूण १३१२८१ गाड्या विकल्या गेल्या होत्या. तेच गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हाच आकडा १९७१२४ इतके होते. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

दुचाकींच्या विक्रीमध्येही सप्टेंबर महिन्यात २३.२९ टक्क्यांची घट झाली. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये १३६०४१५ दुचाकी विकल्या गेल्या होत्या. तर गेल्या महिन्यात १०४३६२४ गाड्या विकल्या गेल्या आहेत.

मला जे योग्य वाटलं तेच मी केलं: राजनाथ सिंह

व्यावसायिक गाड्यांच्या विक्रीमध्ये ३९.०६ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्यावर्षी ९५८७० गाड्या विकल्या गेल्या होत्या तर यावर्षी ५८४१९ गाड्या विकल्या गेल्या आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Indias passenger vehicle sales plunge 24 percent in September amid slowdown in auto sector