पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंदीमुळे चित्रपटगृहांना अच्छे दिन, सिनेमे हाऊसफुल्ल; PVRच्या सीईओंचे निरीक्षण

बॉक्स ऑफिस

गेल्या काही महिन्यांपासून देशात आर्थिक मंदीचे वातावरण असले तरी चित्रपटगृहांच्या व्यवसायाला अच्छे दिन आले असल्याचे देशातील सर्वात मोठ्या पीव्हीआर पिक्चर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमल ग्यानचंदानी यांनी म्हटले आहे. मंदीमुळे निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणापासून दूर राहण्यासाठी लोक चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहण्याला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख विसरलाय, राधाकृष्ण विखेंची टीका

कमल ग्यानचंदांनी म्हणतात, जूनमध्ये कबीर सिंग प्रदर्शित झाला. तेव्हापासून लहान बजेट असलेले आणि फारसे चर्चेत नसलेले सिनेमेही चांगला व्यवसाय करीत आहेत. हे चित्रपट पाहण्यासाठी लोक सिनेमागृहात येत आहेत. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीचे निकाल आल्यावर अनेकांना नक्कीच आश्चर्य वाटेल, असे त्यांनी सांगितले.

बॅग फेकल्यामुळे वाशी स्थानकावर लोकलच्या पेंटाग्राफला लागली आग

आर्थिक मंदीमुळे चित्रपटगृहांच्या व्यवसायाला फायदा होतो आहे. बाजारात मंदीमुळे नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे लोक सिनेमा बघण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जात आहेत, असेही कलम ग्यानचंदानी यांनी म्हटले आहे.