पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Union budget 2020: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी ७० हजार कोटींची तरतूद

भारतीय रेल्वे

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शनिवारी आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी त्यांनी रेल्वेसाठी ७० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर त्यांनी भांडवली खर्चासाठी एकूण १.६१ लाख कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. हा भांडवली खर्च चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत केवळ ३ टक्के जास्त आहे. 

आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये भांडवली खर्चासाठी १.५६ लाख रुपये निर्धारित करण्यात आले होते. जे २०१८-१९ च्या तुलनेत १७.२ टक्के जास्त होते. सुधारित अंर्थसंकल्प २०१९-२०च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये प्रवासी, माल भाडे, इतर मार्गाने आणि रेल्वे भरती बोर्डच्या उत्पन्नात एकूण ९.५ टक्क्यांच्या वाढीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. 

Corona virus: एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातून ३२३ भारतीय दिल्लीत दाखल

२०२०-२१ मध्ये १२ हजार कोटी रुपये नव्या मार्गांसाठी, २२५० कोटी रुपये मूल्य बदलांसाठी, ७०० कोटी रुपये दुहेरीकरण, ५,७८६.९७ कोटी रुपये रेल्वे डबे आणि इंजिनसाठी, १६५० कोटी रुपयांची तरतूद सिग्नल आणि दूरसंचार सेवेसाठी करण्यात आली आहे. यावर्षी रेल्वे प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी २७२५.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

अर्थसंकल्पात १,२६.५ कोटी टन माल वाहतुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जी चालू आर्थिक वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पापेक्षा ४.२ कोटी टन (३.४ टक्के) जास्त आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षांत प्रवासी भाड्यातून ६१००० कोटी रुपये आणि माल वाहतुकीतून १,४७००० कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज आहे. जो सुधारित अंदाज २०१९-२० पेक्षा ९.६ टक्के अधिक आहे.

गोळीबार करणाऱ्या तरुणाकडून 'हिंदू राष्ट्र जिंदाबाद' अशी घोषणाबाजी

रेल्वेचा परिचालन (ऑपरेटिंग) प्रमाण २०१९-२० मध्ये ९५ टक्के ठेवण्यात आला होता. जो २०१९-२० मध्ये ९७.४६ टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. रेल्वेचा उत्पन्नापेक्षा जास्त भाग परिचालनावर खर्च होतो. वर्ष २०२०-२१ मध्ये रेल्वेचा परिचालन प्रमाण ९६.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

रेल्वे मार्गालगत असलेल्या रेल्वेच्या स्वमालकीच्या रिकाम्या जागेवर सौर ऊर्जा यंत्र लावणे आणि चार स्थानकांचा पुनर्विकास करणे तसेच १५० रेल्वे सार्वजनिक-खासगी भागिदारीवर चालवायला देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रमुख पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी तेजस रेल्वेप्रमाणे आणखी काही गाड्या सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

हा अर्थसंकल्प मुठभर भांडवलदारांसाठीच: मायावती