पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सप्टेंबरमध्ये निर्यातीत ६.५७ टक्क्यांची घसरण

सप्टेंबरमध्ये भारतीय निर्यातीत ६.५७ टक्क्यांची घसरण (प्रतिकात्मक छायाचित्र)

अमेरिका आणि युरोपच्या बाजारातून मागणी घटल्यामुळे चालू वर्षांच्या सप्टेंबरमध्ये भारतीय निर्यात ६.५७ टक्क्यांच्या घसरणीसह २६.०३ अब्ज डॉलरवर आली आहे. तर गेल्यावर्षी याच काळात हा आकडा २७.८७ अब्ज डॉलर इतका होता.

भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत, नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी

सरकारकडून मंगळवारी ही आकडेवारी जारी केली. त्यात म्हटले की, ऑगस्ट २०१९ मध्ये भारतीय निर्यात २६.१३ अब्ज डॉलर होती. चालू आर्थिक वर्षांत सप्टेंबरपर्यंत निर्यात २.३९ टक्क्यांनी घटून १५९.५७ अब्ज डॉलरपर्यंत आली. तर यापूर्वीच्या आर्थिक वर्षांत १६३.४८ अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये एकूण आयात १३.८५ टक्क्यांनी घटून ३६.८९ अब्ज डॉलर नोंदवण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर २०१९ पर्यंत एकूण आयात ७.०१ टक्क्यांनी घसरुन २४३.२८ अब्ज डॉलरपर्यंत आली आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षांत सप्टेंबर २०१८ पर्यंत एकूण आयात २६१.६३ अब्ज डॉलर इतकी होती.

अर्थमंत्री स्वतःच्या पतीचं तरी ऐकणार का?, शरद पवार यांचा सवाल

आकडेवारीनुसार एप्रिल ते ऑगस्ट २०१९ मध्ये सेवा आणि वस्तूंची एकूण निर्यात अंदाजे १.९३ टक्क्यांच्या वाढीसह २६७.२१ अब्ज डॉलर झाली आहे. या कालावधीत एकूण आयात ३.१५ टक्क्यांनी घटून ३१२.१६ अब्ज डॉलर झाली आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये व्यापारात घसरण होऊन ते १०.८६ अब्ज डॉलर झाले. सप्टेंबर २०१८ मध्ये हा आकडा १४.९५ अब्ज डॉलर होता. चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत एकूण व्यापार तूट ४४.९५ अब्ज डॉलरपर्यंत आले आहे. तर मागील आर्थिक वर्षांत याच कालावधीत व्यापार तूट ६०.१६ अब्ज डॉलर होती.