अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये दाखल होणार आहेत. पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणाऱ्या ट्रम्प यांच्या स्वागताची अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यात भारत-अमेरिका यांच्यातील महत्त्वपूर्ण व्यापारी करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एवढं गोंधळलेलं सरकार मी पाहिलं नाहीः फडणवीस
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, शिखर बैठकीच्या दरम्यान दोन्ही देशांमध्ये पाच महत्त्वपूर्ण करार करण्याबाबत तयारी सुरु आहे. यामध्ये २५ हजार कोटी रुपयांचा संरक्षण करार होण्याची संभावना आहे. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या उद्देशाने ट्रम्प यांचा भारत दौरा महत्त्वपूर्ण असल्याचे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही वाशिंग्टनमधील संमेलनानंतर सांगितले आहे.
शाहिन बागमध्ये शांतता, पोलिसांनी रस्ते बंद केलेः मध्यस्थांचा अहवाल
अमेरिकन वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रासंदर्भातील महत्त्वपूर्ण घटकावर विशेष भर दिला जाणार आहे. २०१८ मध्ये दोन्ही देशांत व्यापार हा १४२ अब्ज डॉलरहून अधिक झाला होता. यात आणखी वाढ करण्याच्या दिशेने काही महत्वपूर्ण पावले उचलण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्यावेळी दोन्ही देशांमध्ये कमीत कमी पाच महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. यात संरक्षण क्षेत्रासोबतच एच वन बी व्हिसा संदर्भातील विषय मार्गी लावण्याच्या उद्धेशाने चर्चा अपेक्षित आहे..