पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होणार'

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत या वर्षी ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. 'आयएचएस मार्केट'ने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात हा अंदाच वर्तवण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, २०२५ पर्यंत भारत जपानला मागे टाकून आशियातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल. 'टाइम्स नाउ'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील बँकांमध्ये एका वर्षात ७१ हजार कोटींचे घोटाळे

२०१९-२३ या दरम्यान जीडीपीचा सरासरी वृद्धी दर हा सात टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. अहवालात म्हटले की, २०१९ मध्ये भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल आणि देशाचा जीडीपीचा आकार ३००० अब्ज डॉलरच्या पुढे जाईल. भारत ब्रिटनला मागे टाकेल. २०२५ मध्ये भारताच्या जीडीपीचा आकार जपानपेक्षा अधिक असेल. 

मी राजकारणात आलो, तर बायको सोडून जाईल - रघुराम राजन

अहवालात म्हटले की, जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत भारत सातत्याने पुढे जाईल. जागतिक जीडीपी वाढीत भारताचे योगदानही वाढेल. जीडीपी उत्पादन क्षेत्राचा हिस्सा सध्या १८ टक्के असून २५ टक्क्यांचे लक्ष्य आहे. पुढील दोन दशकांदरम्यान भारतीय श्रमशक्तीत प्रत्येक वर्षी सरासरी ७५ लाख लोक जोडले जातील. यामुळे मोदीसरकारवर उत्पादन आणि सेवा क्षेत्रात रोजगार निर्मितीचा दबाव असणार आहे.