पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'२०२४ पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था'

उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात अमित शहा

येत्या २०२४ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली असेल, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. ते उत्तर प्रदेशातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

पवारसाहेबांनी आत्मचिंतन करण्याची गरज, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

उत्तर प्रदेशात विविध ६५ हजार कोटी रुपयांच्या कामाच्या २५० प्रकल्पांचे भूमिपूजन रविवारी पार पडले. यावेळी अमित शहा म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था जगात ११ क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेली आहे. खूप कमी वेळेत योगी आदित्यनाथ यांनी स्वप्नांचे सत्यात रुपांतर केले आहे. त्यांच्या नेतृत्त्वात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली आहे. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेत उत्तर प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आदित्यनाथ यांनी राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. उत्तर प्रदेशातील ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे तीन लाख रोजगार निर्मिती होणार आहे. गेल्या काही वर्षात आपण उत्तर प्रदेशातील गुंतवणूक वाढविण्यासाठी उद्योगपती आणि भांडवलदारांशी सातत्याने संपर्क साधला. त्यातूनच ही कामे राज्याच्या वाट्याला आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५० नेते भाजपच्या संपर्कातः गिरीश महाजन

पेप्सिकोने शनिवारीच उत्तर प्रदेशात ५१४ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. उत्तर प्रदेशात स्नॅक्स तयार करण्याचा कारखाना उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच येत्या तीन वर्षांत ही गुंतवणूक करण्यात येणार आहे.