पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे भारताने केले बंद

इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे भारताने केलं बंद

अमेरिकेने निर्बंधातून दिलेली सूट या महिन्याच्या प्रारंभी संपल्यानंतर भारताने इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याचे बंद केले आहे. अमेरिकेतील भारताच्या राजदुतांनी शुक्रवारी ही माहिती दिली. भारताने इराणसह व्हेनेजुएलाकडूनही कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. 

..तर उद्ध्वस्त करुन टाकू, ट्रम्प यांचा इराणला इशारा

अमेरिकेने इराणबरोबर अणवस्त्र करारातून अंग काढून घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात अनेक आर्थिक निर्बंध लावण्याची घोषणा केली होती. परंतु, त्यांनी आठ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी सूट दिली होती. याचा कालावधी मे महिन्याच्या सुरुवातीस संपला. 

महासत्तांचे व्यापारयुद्ध आणि भारत

अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन शृंगला म्हणाले की, अमेरिकेने निर्बंधातून सूट देण्याचा कालावधी वाढवण्यास नकार दिल्यानंतर भारताने इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. एप्रिलमध्ये इराणकडून खरेदी केले जाणाऱ्या कच्च्या तेलाचे प्रमाण सुमारे २.५ अब्ज टनावरुन घटवून १ अब्ज टन केले होते.

विश्लेषण : पेट्रोल-डिझेलच्या किंमती १९ मे नंतर का वाढणार?