पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंबानींच्या संपत्तीत होत आहे घट तर डी मार्टच्या दमाणींचा वाढता आलेख

रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी

कोरोना विषाणूमुळे देशातील सर्वांत मोठे श्रीमंत रिलायन्स इंड्रस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना मोठा फटका बसला आहे. गौतम अदानी, शिव नाडर आणि उदय कोटक यांच्यासारख्या उद्योगपती जगातील पहिल्या १०० यादीतून बाहेर पडले आहेत. लॉकडाऊनमुळे या उद्योगपतींची संपत्ती घटत आहे. केवळ एक उद्योगपती असे आहेत की ज्यांची संपत्ती वाढत आहे. एव्हेन्यू मार्ट्स सुपरमार्केट चेन डी मार्ट सध्या जोरात सुरु आहे. भारतातील लॉकडाऊनच्या काळात डी मार्टमधील विक्री प्रचंड वाढली आहे.

आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय

एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे प्रमोटर राधाकिशन दमाणी यांची संपत्ती यावर्षी ५ टक्क्यांनी वाढून १०.२ अब्ज डॉलर झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, दमाणी भारतातील एक डझन अब्जाधीशांमधील एकमेव असे व्यक्ती आहेत. ज्यांची संपत्ती वाढत आहे. यावर्षी एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या हिश्श्यात १८ टक्क्यांची तेजी दिसून आली. दमाणी यांच्या संपत्तीतील सर्वांत मोठा हिस्सा हा या कंपनीच्या शेअरमधील आहे. 

राज्यपालांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे आमदार होणार

लॉकडाऊन संपताच कंपनीच्या व्यवसायाची वाढ आणखी चांगली राहिल. या सुपरमार्केटमध्ये ग्राहकांना अनेक पर्याय मिळतात. त्याचबरोबर आपल्या व्हेंडर्सबरोबर व्यवहार करण्यासाठी ते विख्यात आहेत. महसूलाच्या आधारावर देशातील दुसरी सर्वांत मोठी साखळी असणाऱ्या फ्यूचर समूहाचे हिस्सा ८० टक्क्यांनी कमी झाला आहे. देशभरात १३०० हून अधिक स्टोअर्स असणाऱ्या या कंपनीवरील कर्जाचा भार सातत्याने वाढताना दिसत आहे.

लॉकडाऊन इफेक्ट, इंधन वापरामध्ये दशकातील सर्वात मोठी घट

undefined
  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india richest mukesh Ambani losing wealth inculding Adani shiv nadar kotak but dmart Radhakishan Damani increased