पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीडीपी घटला अन् घटणार! भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी

अर्थव्यवस्था

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांच्या यादीत भारत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. ब्रिटन आणि आणि फ्रान्सला मागे टाकत भारताने अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले आहे. अमेरिकेच्या वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्हू या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, भारत खुली बाजारपेठ म्हणून विकसित होत आहे, असेही या संस्थेने म्हटले आहे.  

 

'त्या' जहाजमधील आणखी दोन भारतीयांना कोरोनाचा विळखा

अहवालानुसार, 'सकल राष्ट्रीय उत्पादन' (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) अर्थात जीडीपीमध्ये २९४० अब्ज डॉलरसह भारत जगातील पाचव्या क्रमांकावर आहे. भारताने ब्रिटनची अर्थव्यवस्था २८३० अब्ज डॉलर तर फ्रान्सची अर्थव्यवस्था २७१० अब्ज डॉलर इतकी आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) तत्वावर भारताचा जीडीपी हा १० हजार ५१० अब्ज इतका असून यात भारत जपान आणि जर्मनीच्या पुढे आहे. असे असले तरी सातत्याने तिसऱ्या तिमाहितीतही भारताचा जीडीपी वृद्धीदर कमी राहण्याची शक्यता या संस्थेने वर्तवली आहे.

महात्मा गांधी स्वत:ला कट्टर सनातनी हिंदू मानायचे : मोहन भागवत

 भारताचा जीडीपी ७.५ टक्क्यावरुन ५ टक्के इतका घसरला आहे. त्यात आणखी घट होण्याचा अंदाज  अमेरिकेच्या वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्हू  या संस्थेने वर्तवला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने १९९१चे नवीन आíथक धोरण हे एक ऐतिहासिक पाऊल ठरल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. परदेशी व्यापार आणि गुंतवणुकीतील निंयत्रण, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत झाली, असेही संस्थेने अधोरेखित केले आहे.