पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्राप्तिकर विभागाकडून नवे रिटर्न, करदात्यांची अधिकची माहिती घेणार

प्राप्तिकर रिटर्न

प्राप्तिकर विभागाने नव्या स्वरुपातील विवरणपत्र (रिटर्न)आणले असून, हे सर्व ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर या विवरणपत्रांसोबत प्राप्तिकरदात्यांना आपली अधिकची माहितीही जाहीर करावी लागणार आहे. २०१८ मध्ये सादर करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायदा १९६१ मध्ये सुचविण्यात आलेल्या बदलांचा विचार करून नवे विवरणपत्र तयार करण्यात आले आहेत. मिंटने या संदर्भातील बातमी प्रसिद्ध केली आहे.

नवे विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीनेच भरण्याची अट प्राप्तिकर विभागाने घातली आहे. यामधून फक्त ८० वर्षांवरील प्राप्तिकरदात्यांना सूट देण्यात आली आहे. ८० वर्षांवरील प्राप्तिकरदाते त्यांचे विवरणपत्र लेखी स्वरुपात दाखल करू शकतील. ऑनलाईन पद्धतीने विवरणपत्र भरण्याची सक्ती वैयक्तिक करदाते, कॉर्पोरेट, व्यावसायिक आणि अन्य सर्व प्रकारच्या करदात्यांना करण्यात आली आहे. 

नव्या पद्धतीचे विवरपणत्र भरताना करदात्यांना आपली अधिकची माहितीही द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर गरजेप्रमाणे करदात्याने भरलेली माहिती तातडीने पडताळूनही पाहिली जाईल. या पद्धतीने विवरणपत्र भरण्यात आल्यामुळे करदात्यांना प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) लवकर मिळणार आहे.

प्राप्तिकराचे विवरणपत्रांचे महत्त्वाचे नवे प्रकार
१. आयटीआर १ (सहज) - वार्षिक ५० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या नोकरदार करदात्यांना हे विवरणपत्र भरावे लागेल. 
२. आयटीआर २ - आयटीआर एकच्या कक्षेत न येणारे वैयक्तिक करदाते यांना आयटीआर २ चा वापर करावा लागेल. 
३. आयटीआर ३ - व्यवसायातून नफा कमाविणाऱ्या करदात्यांचा यामध्ये समावेश आहे.
४. आयटीआर ४ (सुगम) - वैयक्तिक करदाते, एलएलपीशिवाय नोंदणी असलेल्या संस्था यांचे ५० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असेल, तर त्यासाठी या विवरणपत्राचा वापर करावा लागेल.

सविस्तर माहितीसाठी वाचा