पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'द ललित' हॉटेल्सच्या एमडी ज्योत्स्ना सुरींच्या कार्यालयांवर इन्कम टॅक्सचे छापे

ज्योत्स्ना सुरी

करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये प्राप्तिकर विभागाने सोमवारी भारत हॉटेल्स समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योत्स्ना सुरी यांच्या कार्यालयांवर छापे टाकले. 'द ललित' ही प्रख्यात पंचतारांकित हॉटेल्स याच समूहाची आहेत. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

बहुमत आहे म्हणून बळजबरी करू शकत नाही, चंद्रकुमार बोस यांचे खडे बोल

रविवारी रात्रीपासून या छाप्यांना सुरुवात झाली. ज्योत्स्ना सुरी यांच्या जवळचे जयंत नंदा यांच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे. १९ नोव्हेंबर २००८ पासून द ललित नावाने या समूहाने आपल्या हॉटेल्सचे ब्रॅंडिंग करण्यास सुरुवात केली. नवऱ्याच्या निधनानंतर ज्योत्स्ना सुरी यांच्याकडे भारत हॉटेल्स समूहाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आली. ज्योत्स्ना सुरी या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स एँड इंडस्ट्रिजच्या माजी अध्यक्षा आहेत.

नांदेडः चार शिक्षकांचा विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार