पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या प्रोफेशनल्सची संख्या वाचून धक्काच बसेल!

प्राप्तिकर विभाग

एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न दाखवणाऱ्या प्रोफेशनल्सची संख्या किती असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. प्रोफेशनल्समध्ये अर्थात डॉक्टर्स, चार्टर्ड अकाऊंटंट, वकील आणि इतरांचा समावेश होतो. प्राप्तिकर विभागाने ट्विट्स करीत २०१८-१९ या आर्थिक वर्षातील हा आकडा जाहीर केला आहे. हा आकडा आहे २२००. म्हणजेच त्या आर्थिक वर्षात २२०० प्रोफेशनल्सनी आपले वार्षिक उत्पन्न एक कोटींपेक्षा जास्त असल्याचे दाखवले.

'भीमा-कोरेगावचा तपास एनआयएकडे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा'

प्राप्तिकर विभागाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वैयक्तिक करदात्यांनी दाखल केलेल्या विवरणपत्रानुसार २०१८-१९ या आर्थिक वर्षात २२०० प्रोफेशनल्सचे वार्षिक उत्पन्न एक कोटींपेक्षा जास्त आहे. प्रोफेशनल्समध्ये डॉक्टर्स, चार्टर्ड अकाऊंटंट, वकील आणि इतरांचा समावेश होतो. या उत्पन्नामध्ये इतर उत्पन्न उदा. भाडे, व्याज, भांडवली फायदा याचा विचार केलेला नाही. 

मासिक पाळीसाठी विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावली

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशातील करदात्यांना आपला कर प्रामाणिकपणे भरण्याचे आवाहन केले होते. जर करदात्यांपैकी कोणी प्रामाणिकपणे कर दिला नाही किंवा कर चुकविला तर त्याचा भार विनाकारण प्रामाणिकपणे कर देणाऱ्यांवर पडतो. त्यावेळीच त्यांनी देशातील केवळ २२०० लोकांनी आपले वार्षिक उत्पन्न एक कोटींपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले.