पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी तात्पुरतीः IMF

ख्रिस्तिलीना जॉर्जिवा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा देणारे वृत्त दिले आहे. आयएमएफच्या प्रमुख ख्रिस्तिलीना जॉर्जिवा यांनी शुक्रवारी म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्थेतील सुस्ती ही तात्पुरती आहे. आशा आहे की येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होईल. दावोस येथे आयोजित जागतिक अर्थ परिषद २०२० मध्ये त्या म्हणाल्या की, ऑक्टोबर २०१९ मध्ये आयएमएफद्वारे घोषित जागतिक आर्थिक पाहणीच्या तुलनेत जानेवारी २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. दुसऱ्या तिमाहीत भारताच्या आर्थिक विकासाचा दर घटून अवघा ४.५ टक्के इतका राहिला आहे. जो मागील साडेसहा वर्षांतील सर्वांत नीचांक स्तरावर आहे.

CAA: सुमित्रा महाजनांसह भाजपचे नेते पोलिसांच्या ताब्यात

ख्रिस्तिलीना जॉर्जिवा म्हणाल्या की, अजूनही अर्थव्यवस्थेत सुस्ती आहे. आम्हाला वाटते की वित्तीय नीती अधिकाधिक आक्रमक व्हाव्यात आणि संरचनात्मक सुधारणांमध्ये तेजी आणली जावी.  

'बजरंग दल, भाजपच्या विरोधानंतरही महाराष्ट्र बंद यशस्वी'

आम्हाला भारतीय बाजारात सुस्ती दिसत आहे. पण ही तात्पुरती सुस्ती असेल असे आम्हाला वाटते. येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होईल. इंडोनेशिया तथा व्हिएतनामसारख्या अर्थव्यवस्था पण चमकत्या ताऱ्यांप्रमाणे आहेत. काही आफ्रिकन अर्थव्यवस्थाही चांगील कामगिरी करत आहे. तर मेक्सिकोसारख्या देशात काही सुधारणा होताना दिसत नाही.

रेडी रेकनरच्या दरात कपात करा, आदित्य ठाकरेंची शिफारस

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IMF chief Kristalina Georgieva claims slow pace of development in India hope for early recovery