पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर्थिक मंदी दूर करण्यासाठी तातडीने पावले टाका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची भारताला सूचना

भारतातील आर्थिक मंदी (प्रातिनिधिक छायाचित्र)

भारतातील आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्था हे जागतिक विकासाचे एक प्रमुख इंजिन आहे. त्यामुळे भारताने आपल्या अर्थव्यवस्थेतील मंदीवर तातडीने उपाय योजले पाहिजेत, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणणे आहे.

... तर झारखंडमधून एकही उमेदवार राज्यसभेत पाठविणे भाजपला शक्य नाही

जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक भारतीय अर्थव्यवस्था आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून देशात मंदीची स्थिती आहे. ग्राहकांकडून मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गुंतवणुकीतही घट झाली आहे. यामुळे सरकारच्या कर महसुलाच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला आहे, याकडे नाणेनिधीने लक्ष वेधले. 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आशिया-पॅसिफिक विभागाचे रानिल सालगाडो म्हणाले, अनेक लोकांना गरिबीतून बाहेर काढल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था सध्या पेचात सापडली आहे. या पेचातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची नितांत गरज आहे. विकासाला चालना देण्यासाठी सरकारी निधी वितरित करण्यावरही सरकारकडे मर्यादित संधी उपलब्ध आहे. 

कल्याण ते डोंबिवलीदरम्यान बुधवारी मेगा ब्लॉक, अनेक एक्स्प्रेस रद्द

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी गेल्या आठवड्यात भारताच्या विकासदराचा अंदाज पुढील महिन्यात जाहीर होणाऱ्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक'मध्ये आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली होती.