पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पोस्टात बचत खातं असेल तर जाणून घ्या हे नियम

पोस्ट कार्यालय

पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचे बचत खाते असेल तर किमान शिलकीच्या (मिनिमम बॅलन्स) नव्या नियमांची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. आता ५० रुपयांऐवजी बचत खात्यात किमान ५०० रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. जर तुमच्या खात्यात किमान ५०० रुपये नसतील तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

एअर इंडियाचे खासगीकरण, आता सर्व हिस्सा विकण्याची सरकारची तयारी

पोस्ट खात्याने बचत खात्यावरील किमान शिलकीची मर्यादा ५० रुपयांवरुन वाढवून ५०० रुपये केली आहे. जर तुमच्या खात्यात किमान ५०० रुपये नसतील तर आर्थिक वर्षाच्या अंतिम दिवशी पोस्ट १०० रुपये दंड आकारेल. असे प्रत्येक वर्षी होईल. जर या खात्यात शून्य शिल्लक असेल तर हे खाते आपोआप बंद केले जाईल.

लवकर पॅन आणि आधारकार्ड द्या, नाही तर कंपनी तुमचा २० टक्के पगार कापेल

पोस्ट संचालनालयाने सर्व पोस्ट कार्यालयांना खातेधारकांना किमान शिल्लक ठेवण्यासाठी संपर्क साधण्यास सांगितले आहे. खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यामुळे पोस्ट खात्याला वार्षिक २८०० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

जाणून घ्या पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्याचे काय आहेत फायदे...

- खाते सुरु करण्यासाठी किमान २० रुपयांची आवश्यकता
- वैयक्तिक/संयुक्त खात्यावर ४.० टक्के दराने वार्षिक व्याज मिळते
- केवळ रोख रकमेद्वारे खाते सुरु करता येईल
- विना धनादेश सुविधा असलेल्या खात्यात किमान ५० रुपये आवश्यक
- ५०० रुपयांसह सुरु करण्याऱ्या खात्याला धनादेशाची सुविधा देण्यात येईल. यासाठी खात्यात किमान ५०० रुपये असणे आवश्यक
- एखाद्या सुरु असलेल्या खात्यावरही चेकची सुविधा घेता येऊ शकते
- आर्थिक वर्ष २०१२-१३ पासून अर्जित व्याज प्रति वर्ष १०००० रुपये पर्यंत मुक्त आहे
- नामांकनाची सुविधा खाते सुरु करताना तथा खाते सुरु केल्यानंतरही उपलब्ध आहे
- एका पोस्ट कार्यालयामधून दुसऱ्या पोस्ट कार्यालयामध्ये खाते स्थानांतरित करता येऊ शकते

भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी तात्पुरतीः IMF


- अल्पवयीन व्यक्तीच्या नावेही खाते उघडता येऊ शकते 
- संयुक्त खाते दोन किंवा तीन सज्ञान व्यक्तींद्वारेही उघडता येईल.
- खाते सक्रिय राहण्यासाठी तीन आर्थिक वर्षांत जमा किंवा पैसे काढण्याचा किमान एक व्यवहार होणे आवश्यक
- एकल खाते संयुक्त खात्यात आणि संयुक्त खाते एकल खात्यात परिवर्तित करता येऊ शकत
- सज्ञान झाल्यानतर त्या व्यक्तीला आपल्या नावे स्थानांतर करण्यासाठी अर्ज द्यावा लागेल
- सीबीएस पोस्ट कार्यालयात कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे जमा आणि काढता येऊ शकतील
- एटीएमची सुविधाही मिळेल

...तर PM मोदींनी सीतारामण यांचा राजीनामा घ्यावा : पृथ्वीराज चव्हाण