पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लवकर पॅन आणि आधारकार्ड द्या, नाही तर कंपनी तुमचा २० टक्के पगार कापेल

पगार कापला जाईल

जर आपले वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्याहून अधिक असेल तर आपल्या कंपनीला पॅन आणि आधार कार्डाचा तपशील द्या. अन्यथा आपला पगार कापला जाऊ शकतो. प्रत्यक्षात, प्राप्तिकर विभागाच्या नवीन नियमांनुसार, जर एखादा कर्मचारी या दोन्ही गोष्टी आपल्या कंपनीला दिली नसेल तर त्याच्या पगारामधून २० टक्के टीडीएस वजा केला जाऊ शकतो.

राज्यातील ५४ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यासाठी ८६ पानांचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकामध्ये असे नमूद केले आहे की, 'कर्मचार्‍यांना आयकर कायद्यातील कलम २०६-एए अंतर्गत त्यांच्या कंपनीला पॅन आणि आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक आहे. जर कर्मचारी या दोन्ही माहिती प्रदान करत नसेल तर कंपनी त्याच्या वार्षिक पगारातून २० टक्के पगार कपात करु शकते.' 

प्रकाश आंबेडकर हेच भिडे-एकबोटेंना वाचवत आहेत, जयंत पाटलांचा

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) १६ जानेवारीपासून हा नियम लागू केला आहे. हा नियम ज्यांचे उत्पन्न वर्षाकाठी अडीच लाख आणि त्याहून अधिक आहे त्यांना लागू असेल. हा नियम यासाठी लागू करण्यात आला असावा जेणे करुन टीडीएस देयकावर लक्ष ठेवण्याबरोबरच या विभागातील महसुलातही वाढ होईल. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलनापैकी ३७ टक्के यामधून आले आहेत.

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर