पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हा सावध! मोबाइल चार्ज करतानाही बँक अकाऊंट होऊ शकते रिकामे

व्हा सावध! मोबाइल चार्ज करतानाही बँक अकाऊंट होऊ शकते रिकामे

जर तुम्हाला एखाद्या चार्जिंग स्टेशनवर आपला फोन चार्ज करायचा असेल तर तत्पूर्वी दोन वेळा विचार करा. योग्य ती खबरदारी घेतली नाही तर तुमचे बँक खाते काही क्षणात रिकामे होऊ शकते. कारण मालवेअर तुमचा फोन शोधून तो संक्रमित करु शकतो. त्यामुळे हॅकर्सला तुमचा पासवर्ड आणि डेटा चोरी करण्याची संधी मिळू शकते. देशातील सर्वांत मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने इशारा दिला आहे.

भाजपला पर्याय हवाय पण देशात राहणारा, शरद पवारांचा राहुल गांधींना टोला

एसबीआयने आपल्या ४२ कोटी ग्राहकांना कोठेही आपला फोन चार्ज न करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या फसवणारी टोळी फोन चार्ज करताना थेट व्हायरस पाठवून फोन हॅक करुन ऑनलाइन खात्याशी निगडीत पासवर्ड आणि इतर डेटा चोरी करत आहेत. यामुळे एसबीआयने एक टि्वट करुन याच्याशी निगडीत धोक्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही सार्वजनिका ठिकाणाहून फोन चार्ज करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. तुमच्या फोनमधील डेटा काही क्षणात हॅक केला जाऊ शकतो.

..तर परवेझ मुशर्रफ यांनाही नागरिकत्व मिळावं: सुब्रमण्यम

साधारणपणे सर्व फोनमध्ये चार्जिंग पोर्ट डेटा कनेक्शन आणि यूएसबी म्हणून वापरला जातो. त्याच्याच मदतीने तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल केला जाऊ शकतो किंवा तुमच्या फोनमधील डेटा कॉपी केला जाऊ शकतो. ग्राहकांचा पर्सनल डेटा चोरी करणे हा एक पद्धतीचा सायबर हल्ला आहे. फोनच्या चार्जिंग पोर्टच्या माध्यमातून ही फसवणूक केली जाऊ शकते.

एसबीआयने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, ग्राहकांनी कोठेही चार्जिंग स्टेशनवर आपला फोन चार्ज करु नये. व्हायरस डेटामुळे तुमच्या फोनवरील डेटाही धोक्यात येऊ शकतो. तुम्ही हॅकर्सला आपला पासवर्ड आणि डेटा एक्सपोर्ट करण्याची संधी देऊ शकता. त्यामुळे बँकेने कोठेही आपला फोन चार्ज करु नये असा सल्ला दिला आहे.

... तर ज्ञानदेव म्हणाले असते अच्छे दिन येईचिना - उद्धव ठाकरे