पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोने विकायचा विचार करत असाल तर 'हे' अवश्य वाचा

सोन्याचे दागिने

घरातील लग्न, समारंभ किंवा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सोने विकायचा तुमचा विचार असेल तर या दोन गोष्टींकडे लक्ष द्या. पहिली बाब म्हणजे, सोने विकल्यानंतर कर द्यावा लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे, सोने खरेदी करताना बिल अवश्य घ्या नाहीतर ते सोने विकताना व्यापारी मनाला येऊल ते भाव लावतील. सोने विकल्यानंतर प्राप्तीकर विभागाने नोटीसही पाठवल्या आहेत.

सोनं विक्रीच्या वृत्तावर आरबीआयचे स्पष्टीकरण

आपल्या देशात सोन्याशी भावनात्मक आकर्षण आहे. सण असो किंवा लग्न, सोने खरेदी करण्याची संधी कोणी सोडत नाही. पण या आनंदाचे रुपांतर तणावात तेव्हा होते, जेव्हा प्राप्तीकर विभागाची नोटीस येते. विशेष म्हणजे सोने विकल्यानंतरही कर द्यावा लागतो, हे बहुतांश लोकांना माहीत नाही. ही माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी प्राप्तीकर विभागाने एक अलर्ट नोटीस जारी केली आहे.

स्टेट बँकेच्या तिमाहीतील नफ्यात तिप्पट वाढ, कारण की...

सोने हे रोखीने, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून खरेदी करता येते. जीएसटी लागू झाल्यापासून ग्राहकांना दागिने खरेदी करताना त्याचे शूल्क द्यावे लागते. सोने विकताना लावण्यात येणारा कर हा ते सोने तुमच्याकडे किती काळ होते यावर अवलंबून असते. 

यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन्सच्या आधारावर कर लागेल. जर तुम्ही दागिने खरेदी केल्यानंतर ३६ महिन्यांच्या आत ते विकले तर त्याच्या वाढलेल्या मूल्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कर द्यावा लागतो. तुम्हाला झालेला फायदा हा तुमच्या एकूण उत्पन्नाशी जोडला जाईल. तुम्ही ज्या कर टप्प्यात येता त्या हिशोबाने कर द्यावा लागतो. ३६ महिन्यांनंतर विकलेल्या लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल. हे सोने विकल्यानंतर झालेल्या फायद्याच्या सुमारे २० टक्के आहे.

रिलायन्स जिओफोनसाठी 'ऑल इन वन' प्लॅन लाँच, काय आहे वेगळेपण

सोने विकताना अनेकवेळा सराफ व्यापारी मेल्टिंग चार्जच्या रुपात पैसे कापतात. अशावेळी तुम्हाला कमीच पैसे मिळतात. या बाबींपासून जर तुम्हाला लांब राहायचे असेल आणि सोन्याची योग्य किंमत मिळवायची असेल तर सोने खरेदी करताना बिल अवश्य घ्या. सोने ज्याच्याकडून खरेदी केले. त्याच व्यापाऱ्याला विका. त्यामुळे तुम्हाला चांगली किंमत मिळते. जर दुसरीकडे विकणार असेल तर थोडे शूल्क देऊन हॉलमार्क केंद्रातून शुद्धतेची तपासणी करुन घ्या. त्यामुळे कोणताही व्यापारी तुम्हाला फसवू शकणार नाही.