पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन लांबल्यास नोकऱ्या संकटात

माहिती तंत्रज्ञान उद्योगात मोठी नोकर कपात होऊ शकते.  (प्रतिकात्मक छायाचित्र)

जगभरात कोविड-१९ चे संकट कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. अमेरिकेपासून ते भारतापर्यंत खळबळ उडवत असलेल्या या कोरोना विषाणूमुळे १८ लाखांहून जास्त लोक बाधित झाले आहेत. तर एक लाख १४ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देश संपूर्ण लॉकडाऊनमध्ये आहेत. भारतातील २१ दिवसांचा लॉकडाऊनची मर्यादा १४ एप्रिल रोजी संपत आहे आणि ३० एप्रिलपर्यंत ती वाढवली जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सर्वांधिक फटका नोकऱ्यांवर पडणार आहे. 

भारतात २४ तासांत कोरोनाचे ६२० नवे रुग्ण

नास्कॉमचे माजी अध्यक्ष आर चंद्रशेखर म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे जर लॉकडाऊन लांबला तर माहिती तंत्रज्ञान उद्योगात मोठी नोकर कपात होऊ शकते. त्यांच्या मते, वर्क फ्रॉम होम (घरातून काम) दीर्घ कालावधीसाठी एक सकारात्मक पैलू असू शकतो. यामुळे आयटी कंपन्यांसाठी हा नवा मार्ग खुला होईल आणि त्यांच्या गुंतवणुकीतही बचत होईल. 

'लॉकडाऊनचा फायदा घेत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर होणार कारवाई'

सध्याची स्थिती आणखी खराब झाली तर स्टार्टअप्ससाठी अडचणी येऊ शकतात. स्टार्टअप्स कंपन्या या आघाडीच्या भांडवलदारांकडून मिळालेल्या निधीतून सुरु आहेत. मोठ्या कंपन्या दोन कारणांमुळे सध्या नोकऱ्या कपात करणार नाहीत. एक तर ते आपले कर्मचारी गमवू इच्छित नाहीत. दुसरे कारण म्हणजे त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैशांची कमतरता नाही. 

धारावीत कोरोना बाधितांचा आकडा ४७ वर, आतापर्यंत ५ मृत्यू

चंद्रशेखर पुढे म्हणाले की, काही मोठ्या कंपन्यांनी जर नोकर कपात केली तर ते कंत्राटी कर्मचारी किंवा इंटर्न कर्मचाऱ्यांना काढतील. जोपर्यंत या कंपन्यांची आर्थिक स्थिती चांगली असेल, तोपर्यंत ते कायम कर्मचाऱ्यांना हटवणार नाहीत. परंतु, ते या स्थितीत किती काळ राहतील, त्यावर सर्व अवलंबून असेल. एक महिना, दोन महिना किंवा तीन महिने. त्यानंतर या कंपन्यांही दबावात येतील. भविष्यात वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता, लॉजिस्टिक्स खर्च आणि कार्यालय स्थळाची बचत होईल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:If lockdown goes long then big crisis of jobs current situation worsens then start up problems increase said ex president of NASSCOM